1 ते 3 मार्च दरम्यान श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन

बीड /परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क 
दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत गजानन महाराज विश्वस्त मंडळ विद्यानगर परळी च्या वतीने 1 ते 3 मार्च दरम्यान चरित्र पारायण सोहळा व हरिनाम सकिर्तनाचा त्रिदिवसीय कार्यक्रम होणार आहे.

दैनिक धार्मिक कार्यक्रमा मधे पहाटे 4 ते 6 काकडा आरती,7 ते 10 चरित्र पारायन,10 ते 12 महिला भजनी मंडळ यांचे भजन, तर रात्री 8 ते 11 या वेळेत कीर्तन होणार आहे. दि.1 मार्च रोजी श्री ची पुजा,अभिषेक व नंतर 10 ते 12 या वेळेत शंभू महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळ यांचे भजन,तर रात्री 8 ते 11 या वेळेत ह.भ.प. सौ. अलकाताई तोंडारे परळी यांचे कीर्तन होणार आहे.2 मार्च रोजी गजानन महाराज महिला मंडळ यांचे भजन,तर रात्री ह.भ.प.भरत महाराज जोगी यांचे कीर्तन होणार आहे. 3 मार्च रविवार सोहळा सांगता दिनी सकाळी 8 ते 10 श्री ची पालखी मिरवणूक, तर सकाळी 10 ते 1 या वेळेत ह.भ.प. तुकाराम महाराज शास्त्री यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील 20 वर्षापासून या धार्मिक सोहळ्याची अखंड परंपरा सुरु असुन विश्वस्त मंडळ यांच्या अथक परिश्रमा तून याठिकाणी धार्मिक कार्यक्रमासह विविध समाजोपयोगी उपक्रमही घेण्यात येतात. यामधे रक्तदान,परिसर स्वच्छता,दर गुरुवारी भजन यांचा समावेश असतो. मंदीर स्थापनेपासुन दर गुरुवारी श्री ना पिठल भाकरी चा नैवेद्य, हरीपाठ, आरती,पुजा असे कार्यक्रम घेण्यात येतात. विश्वस्त मंडळासह परिसरातील भाविक भक्त आदींचा यात हिरिरीने सहभाग असतो. प्रगट दिन सोहळ्या निमीत्त सलग तिन दिवस या ठिकानी यात्रेचे स्वरुप पहावयास मिळते. याही वर्षी 1 ते 3 मार्च दरम्यान होत असलेल्या या भरगच्च धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन