सर्वसामान्यांचे लिंबू महागले

🔷 सर्वसामान्यांचे लिंबूपाणी ही दुर्लभ; लिंबाची आवक घटली,दर आकाशी

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे तसे लिंबू चा बाजार भाव ही चढा होऊ लागला आहे.काही परिस्थितीत फेकून दिले जाणारे लिंबू आता दहा रुपयाचे तीन – चार नगं मिळत आहेत.उन्हाचा तडाखा सकाळी ९ -१० वाजण्याच्या दरम्यान ३० ते ३२ अंशावर जातं आहे.आणि तृष्णा भागवण्यासाठी सामान्याच्या आवाक्यात असलेले लिंबू पाणीही आता दुर्लभ होत आहे.

उन्हाची काहिली वाढण्यास सुरुवात झाली आहे उष्णतेचा पारा 30 -32 अंशाचा आकडा आत्ताच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पार होत आहे दरम्यान सर्वत्र दिसून येणारी लिंबू पाणी गाडी या वेळेस मात्र दिसून येतं नाही. उन्हाळ्यात रसवंती, जूसबार आदी दुकाने लागतात, शहरांतर्गत रस्त्यावर अनेक लिंबू पाणी , सोडा वॉटर, बर्फ गोळा वाले दिसतात पण लिंबाच्या गगनचुंबी दरामुळे अनेकांना लिंबू सरबत गाडी चालवणे अडचणी चे झाले.

उन्हाळ्यात घरोघरी केले जाणारे लिंबूपाणी लिंबाच्या मोठ्या दरामुळे अडचणीत आले आहे, सर्वसाधारण परिस्थितीत पाच ते दहा रुपये अधिकतम 20 रुपये किलो असणारे लिंबू या काळात 30 ते 35 रुपये पाव आहेत. मध्यंतरी लिंबाची मोठी मागणी वाढली होती त्या प्रमाणात पुरवठा होत नव्हता. परळी तालुक्यातील धर्मपुरी, सारडगाव आदी भागातून मोठ्या प्रमाणात लिंबू उत्पादन होते.येथील लिंबू आंध्रप्रदेशातील हैदराबाद येथे पाठवले जाते.तर काही लिंबू स्थानिक बाजारात विकले जाते. मोठ्या प्रमाणावर लिंबांची मागणी वाढल्याने परळी बाजारातून काही अंशी लिबु गायब झाले आहेत. असून किरकोळ भाजीविक्रेते पाच रुपयांचे २-३ लिंबू या भावाने विक्री करीत आहेत.

यावर्षीचा तीव्र असा उन्हाळी हंगाम, सोबतच लग्नसराई सुरू झाल्याने लिंबाचे भाव वधारले आहेत. यावर्षी लिंबाचे उत्पादन कमी झाले असल्याने भाव आणखी वाढू शकतात.
……………………………………………………………………………..

जिल्ह्यात सर्वाधिक लिंबाचे उत्पादन परळी तालुक्यात धर्मापुरी,सारडगाव, मांडवा. या भागात होते, येथीलच लिंबू स्थानिक बाजारातही मिळतो. बाजारात येणारा लिंबू साधारणपणे तीन प्रती मध्ये विभागला जातो. स्थानिक बाजारात दुसऱ्या, तिसऱ्या प्रीतीचा लिंबू मिळतो तर पहिल्या प्रतीचा लिंबू महानगरा कडे पाठविले जाते.