परळीत सकल मराठा समाज महिला भगिनींनी केले रास्ता रोको आंदोलन 

बीड/परळी-वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क – राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे. शनिवार २४ फेब्रुवारी रोजी गावागावात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करावं असं आवाहन जरांगे यांनी केलं होत. जरांगेंच्या या आवाहनाला परळी शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करीत पाठींबा दिला आहे. दरम्यान परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले.

परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक इटके कॉर्नर येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने विशेषता शिवाजीनगर भागातील महिला भगिनींनी रास्ता रोको आंदोलन केले. परळी तालुक्यातील सिरसाळा, धर्मापूरी, गाढेपिंपळगाव, कन्हेरवाडी सर्कल मध्ये अनेक गावात ठिकठिकाणी सकल मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतुकीला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या वाहनांना अडवू नका, असं आवाहन जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं होतं. त्यानुसार, मराठा बांधवांकडून विद्यार्थ्यांच्या वाहनांना रास्ता मोकळा करून देण्यात आला.सकल मराठा समाजाच्या मागण्याची निवेदन विद्यार्थ्यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख उस्मान व परळीचे तलाठी विष्णू गित्ते यांनी स्वीकारले