🔷 ब्राह्मण समाजाचा प्रत्येक संकल्प व मागणीत मी सदैव सोबत – माजी मंत्री पंकजाताई मुंडे
🔷 ब्राह्मण समाजाच्या सर्व मागण्या सोडवण्यासाठी कटीबद्ध -ना. धनंजय मुंडे यांची सरकारच्या वतीने ग्वाही_
🔷 राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा गौरव
बीड/परळी वैजनाथ, एम एन सी न्यूज नेटवर्क … ब्राह्मण समाजाचे या देशाच्या जडणघडणीत आणि संस्कृती रक्षणामध्ये मोठे योगदान असून ब्राह्मण समाज हा अन्य सर्व समाजांना दिशा देणारा समाज आहे. ब्राह्मण समाजाने ऐक्य परिषदेच्या माध्यमातून ज्या मागण्या मांडल्या. त्या सरकारमधील एक जबाबदार मंत्री म्हणून सरकारच्या वतीने या सर्व मागण्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तर ब्राह्मण समाजाचा प्रत्येक संकल्प व मागण्यांसाठी मी सदैव समाजासोबत आहे अशी ग्वाही माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिली. परळीत आयोजित ऐक्य परिषद ऐतिहासिक ठरली. या परिषदेत परळीतून ब्रह्मशक्ती एकवटल्याचे चित्र दिसून आले. या ऐक्य परिषदेला अलोट गर्दी झाली होती.
पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथून सकल ब्राह्मण ऐक्याचा ‘हुंकार’ पुकारण्यात आला. परळी वैजनाथ येथे आज २५ फेब्रुवारीला राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.संपूर्ण दिवस संघटनात्मक व प्रबोधनात्मक भरगच्च कार्यक्रम झाले.प.पू. सुधीरदास महंत (काळाराम मंदिर, नाशिक), धर्मगुरु प.पू.अमृताश्रम स्वामी महाराज, यांचे आशीर्वाचन या परिषदेला लाभले तर राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे, भाजप राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते या ऐक्य परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार नमिता ताई मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती यया ऐक्य परिषदेसाठी संत-महंतांचे आशीर्वच व विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मार्गदर्शन केले. राज्यातून सकल ब्राह्मण समाज हजारोंच्या संख्येने एकवटला होता. न भूतो न भविष्यती अशी ब्राह्मण समाजाची ही ऐक्य परिषद ठरली. या ऐक्य परिषदेत समाजाच्या वतीने विविध ठराव ही मंजूर करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने या परिषदेला प्रारंभ झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रभू वैद्यनाथ व भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करून या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी प्रास्ताविकपर बीजभाषण परिषदेचे स्वागताध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी करताना ब्राह्मण समाजासमोरील आजच्या स्थितीतील विविध प्रश्न, समस्या व शासन दरबारी समाजाच्या न्याय मागण्या याबाबतीत मुद्दे उपस्थित केले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर विविध क्षेत्रात राज्यभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जीवन गौरव, वैद्यनाथ भूषण, ब्रह्मविभूषण, ब्रह्मभूषण, मनस्विनी ब्रह्मश्री व ब्रह्म अर्जुन अशा वर्गवारीत गौरव करण्यात आला.
याप्रसंगी पुढे बोलताना कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले. ब्राह्मण सभाज हा अतिशय सुसंस्कृत समाज असून अन्य सर्व समाजाला दिशादर्शक अशा प्रकारची जबाबदारी या समाजाची आहे. ब्राह्मण ऐक्य परिषद या व्यासपीठावरून केवळ ब्राह्मण समाजाच्या हिताचाच नव्हे तर राष्ट्रहिताचा विचार रुजवला जाणार असल्याचा विश्वास आपल्याला वाटतो .आपली जडणघडण ही संपूर्णतः ब्राह्मण समाजातूनच झाली असून ब्राह्मण समाजाशी आपण एकरूप असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ब्राह्मण समाजाच्या हितासाठी काही मागण्या समाजाच्या व्यासपीठावरून करण्यात आल्या त्या न्याय मागण्या सरकारकडून नक्कीच सोडवल्या जातील. यासाठी मी सरकारच्या वतीने कटिबद्ध असल्याचे ना. धनंजय मुंडे यांनी सांगितले. तर माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अतिशय आत्मीय भावना व्यक्त करत ब्राह्मण समाजात राष्ट्र उन्नतीचे सामर्थ्य असून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा सकल समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठीचा जो विचार आहे तो पुढे घेऊन जात आपण सदैव प्रयत्न करत असतो. ब्राह्मण समाजाने ऐक्यातून उन्नती या सूत्रामधून स्वजनांच्या हिताचा विचार तर केलाच आहे मात्र या सूत्रातून अन्य वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित अशा सर्व समाज घटकांच्या उन्नतीचाही विचार ब्राह्मण समाज सदैव करत आला असून या ऐक्य परिषदेच्या माध्यमातूनही तोच विचार ब्राह्मण समाज नक्की करेल असा विश्वास आहे. हा राष्ट्र उत्थानासाठी अग्रेसर असणारा समाज असून या समाजाच्या सर्व संकल्प व मागण्यांमध्ये आपण सदैव सोबत असल्याची ग्वाही पंकजाताई मुंडे यांनी दिली.
या कार्यक्रमात भागवताचार्य व प्रसिद्ध वक्ते स्व. वा.ना उत्पात स्मृती प्रेरणा पुरस्कार, राष्ट्रीय कीर्तनकार स्व. भरतबुवा रामदासी स्मृती प्रेरणा पुरस्कार व महाराष्ट्राच्या प्रसिद्ध वक्त्या रणरागिनी स्व.ॲड. अपर्णाताई रामतीर्थकर स्मृती प्रेरणा पुरस्कार अनुक्रमे डॉ. मंजुषाताई कुलकर्णी, दाते पंचांगकर्ते मोहन दाते, सौ. उज्वलाताई गौड -शर्मा यांना प्रदान करण्यात आले या ऐक्य परिषदेत सुशील कुलकर्णी (संपादक, ॲनालायजर) , विवेक देशपांडे (प्रथितयश उद्योजक) ब्राह्मण संघर्षकन्या केतकी चितळे (प्रसिद्ध सिनेअभिनेत्री) पंचांगकर्ते श्री मोहन दाते , डॉ. मंजूषाताई कुलकर्णी (प्रशासकीय अधिकारी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई,) , उज्वला जितेंद्र शर्मा-गौड (अध्यक्षा- रणरागिणी महिला मंच, पुणे) श्री. सुरेंद्र चतुर्वेदी, उज्जैन (राष्ट्रीय अध्यक्ष ब्राह्मण महासभा) प्रा. महेश पाटील (शिक्षणतज्ञ) ,श्री. भूषण धर्माधिकारी (संचालक- ध्रुव IAS ॲकॅडमी, मुंबई) श्री. विवेक कुंभेजकर (संस्थापक अध्यक्ष ब्रह्म ॲग्रो) ,प्रा. दीपक कासराळकर (प्रसिद्ध व्याख्याते) श्रीपाद कुलकर्णी (संस्थापक अध्यक्ष BBNG) प्रा. डॉ. विजय पाटील (प्रसिद्ध वक्ते मुंबई) यांचे मार्गदर्शन झाले.
परळीतील या ब्राह्मण ऐक्य परिषदेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई, कोकण ,विदर्भ ,उत्तर महाराष्ट्र ,मराठवाड्यासह विविध भागातून ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ब्राह्मण समाजातील राज्य स्तरावरील सर्व संघटनांचे संमेलन करून ब्राह्मण ऐक्याची प्रतिज्ञा सर्वांना देण्यात आली. संपूर्ण दिवसभर प्रबोधनात्मक व संघटनात्मक विषयावर चर्चा झाली. या ऐक्य परिषदेच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली परळीतील सकळ ब्राह्मण समाजाने अथक परिश्रम घेतले.
●🔸ब्राह्मण समाज ऐक्य परिषदेतील ठराव…
1) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आलेले परशुराम आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करुन भरीव आर्थिक निधी द्या..
2) ब्राह्मण समाजाच्या जमिनीवरील अतिक्रमणासाठी व ब्राह्मण समाजातील व्यक्तीचे होणारे सामाजिक विडंबन बाबत विशेष संरक्षण कायदा पास करावा
3) मुलीच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाचे स्वागत.. पण मुलांनाही मोफत शिक्षणाची मागणी व उच्च शिक्षण व व्यावसाईक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळावी
4) ईनामी जमिनी बाबतीत वर्ग 3 व 2 मधून १ मध्ये वर्ग करावेत व मालकी हक्कात नाव घ्यावे
5) ब्राह्मण समाजाच्या कुळ कायद्याचे पुनर्वावलोकन
व्हावे.
6 . विनोबाजी भावे यांच्या भूदान चळवळीत जमिनी दान दिलेल्या ज्या पडीक जमिनी तशाच पडून आहेत त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्यासाठी विशेष कायदा पारित करावा
7. ब्राह्मण पुरोहित वर्गासाठी मानधन योजना सुरू करावी
8. वेद विद्यालयांना अनुदान व कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम ब्राह्मण समाजातील मुलांसाठी मोफत करावेत
9.ब्राह्मण समाजातील महिलांच्या लघुउद्योग व गृह उद्योगासाठी मायक्रो फायनान्स शून्य टक्के दराने कर्ज योजना मंजूर करावी
10. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा.
11.वेद विद्यालयांना अन्य शाळांप्रमाणे शासकीय अनुदान मंजूर करून कर्मचारी भरती करण्यास मंजुरी द्यावी