ड्रायव्हरविना 78 किमी धावली मालगाडी; जम्मूहून पंजाबला पोहोचली ट्रेन,

सुरू केल्यानंतर हँडब्रेक लावायला विसरले;

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तपासाचे दिले आदेश.

जम्मू-काश्मीर/ कठुआ/होशियारपूर – भारतीय रेल्वे दिवसेन दिवस अत्याधुनिक होत असताना मानवी चुका मात्र आपघातचे निमित्त ठरू शकतात. नुकतीच जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथून एक मालगाडी (14806R) चालक-रक्षका शिवाय पंजाबमध्ये पोहोचली. सुमारे 78 किलोमीटरपर्यंत मालगाडी अशीच धावत राहिली. होशियारपूरमधील उची बस्सी रेल्वे स्थानकावर लाकडी स्टॉपर लावून ती रोखण्यात आली. या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

कठुआ रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या चालकाने इंजिन सुरू केले आणि हँड ब्रेक न लावता खाली उतरले. पठाणकोटच्या दिशेने उतार असल्याने मालगाडी पुढे जाऊ लागली. मालगाडी धावल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी कठुआ रेल्वे स्थानकावर ती थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. काही वेळाने मालगाडीचा वेग वाढला. सादर मालगाडीस अनेक स्थानकांवर थांबण्याचा प्रयत्न केला गेला कठुआ रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पंजाबमधील पठाणकोट येथील सुजानपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेथेही ट्रेन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर पठाणकोट कँट, कांदोरी, मिरथल, बांगला आणि मुकेरियन येथे मालगाडी थांबवण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

हळूहळू मालगाडीचा वेग कमी होऊ लागला. शेवटी होशियारपूरच्या उची बस्सी रेल्वे स्थानकावर लाकडी स्टॉपर लावून मालगाडी थांबली. दरम्यान रेल्वे वाहतूक व्यवस्थापक द्वारे मिळालेल्या माहिती नुसार या धांदलीचा  तपास सुरू केला  घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी संभाव्य सुरक्षा त्रुटी ओळखण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.