एस. चोकलिंगम: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी

लोकसभा निवडणूक/ निवडणूक आयोग

🔷 बीड जिल्हाधिकारी म्हणून पूर्वी काम.

मुंबई –  पुण्यातील यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांची राज्य मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आधी एस. चोकलिंगम या पदावर श्रीकांत देशपांडे होते.

एस. चोकलिंगम १९९६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. बीडचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दरम्यान, देशासह राज्यात लवकरच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची – शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत.