परळीच्या क्षितिजावरील औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व धुरांडी भुईसपाट

अनेकांचा कंठ आला दाटून, ◾ आज उरलेले वीज केंद्राचे अवशेषही काही दिवसात नामशेष होतील.

बीड/परळी-वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क :-परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक १,ते ५, भंगारात काढल्यानंतर एक एक करत चिमन्या पाडण्यात आल्या.आज आकाशाला गवसणी घालणारी आणि एकमेव शिल्लक असणारी ओळख आज दुपारी तीनच्या सुमारास पुसली गेली. या घटनेने अनेकांचा कंठ दाटून आला. आता परळीची क्षितिजरेषा चिमणीशिवाय पाहणे अवघड झाले आहे. औष्णिक वीज केंद्राची ही ४ धुरांडी परळीची अस्मिता आणि ओळख बनली होती. आज ही ओळख पुसल्या गेली.

दि. 12 सप्टेंबर 2022 अखेर या संचाची चिमणी (धुरांडे) पाडण्यात आली हायड्रोलिक गनचा वापर करीत ही चिमणी जमीनदोस्त करण्यात आली. 1980 साली ही चिमणी उभारली गेली होती. सुमारे 120 फूट उंचीची ही चिमणी अवघ्या काही सेकंदात भुई सपाट झाली. एकत्रित दिसणाऱ्या संच क्रमांक तीन, चार आणि पाच या तीन चिमण्या ज्या आकाशाला आकाशाला गवसणी घालत होत्या या चिमणीमुळे परळीची एक वेगळीच ओळख तयार झाली होती. चिमणी पाडल्याने परळीची ही ओळख आता पुसली गेली आहे.

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन 2015 मध्ये बाद केल्यानंतर त्याला भंगारात काढण्यात आले होते.त्यातील साहित्य उचलण्याचे काम मागील काही वर्षापासून चालू होते. 2015 मध्ये या कामाचे कंत्राट शिवालया कंट्रक्शन कंपनीला मिळाले होते. १००० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी येथे काम करीत सर्व भंगार साहित्य उचलून त्याची विल्हेवाट लावली. दरम्यान याच केंद्र परिसरात असलेले संच चार, पाच हे संचही बाद करण्यात आले होते

परळी येथील पहिल्या वीज केंद्राची उभारणी १९६७ ते ७० च्या दरम्यान करण्यात आली. येथे साठ मेगावॅटच्या दोन संचातून वीज निर्मिती होत असतानाच 210 मेगावॅटचा तिसरा वीज निर्मिती संच उभारण्यात आला होता. एकूणच उभारणी आणि कालमर्यादा सुमारे 35 वर्षाची वाढीव मुदत संपल्यानंतर 2015 मध्ये या संचातून होणारी वीज निर्मिती थांबविण्यात आली होती. बाद करण्यात आलेले संच जमीनदोस्त करून येथील भंगार व इतर साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राट काढण्यात आले होते. शिवालया कंट्रक्शन ने हे काम सुरू केल्यानंतर आज शेवटची चिमणी पाडत या कामाला पूर्णविराम दिला आहे. हायड्रोलिकगन चिमणीच्या तळ भागास भेगा पाडत ही चिमणी पाडली गेली.

वीज निर्मितीसाठी जाळण्यात येणाऱ्या कोळशामुळे तयार होणारी राख व होणारा धूर परळीकरांसाठी निश्चितच जीवघेणा होता. परंतु दिसणाऱ्या चिमण्या ही मात्र परळीची ओळख होती. आज ही ओळख पुसली गेली असून सहजपणे दिसणाऱ्या दोन मोठया चिमण्या लवकरच पाडल्या जाणार आहेत. आज प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही रोज पाहणारी चिमणी पडत असताना आम्हाला खूप दुःख झाल्याचे सांगितले. वास्तविक पाहता आणखी काही वर्ष हे संच चालवले गेले असते तर वीज निर्मिती वाढली असती असेही त्यांचे म्हणणे आहे. परंतु कालबाह्य यंत्रसामुग्री वापरून वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे तर नाहीत परंतु कालबाह्य यंत्रणेमुळे जीवित किंवा वित्तहानी सुद्धा होऊ शकली असती शासन स्तरावर म्हणूनच ही सर्व यंत्रणा भुईसपाट करण्याचा निर्णय घेतला गेल्याच सांगण्यात आले

आज दि.१ मार्च २४ रोजी दुपारि तीन ते चार वाजण्याच्या सुमारास संच क्रमांक ५ ची चिमणी पाडण्याचे काम संपुष्टात आले. आणि आयुष्यभर धूर ओकणारी चिमणी आजही धूळ ओकतच जमिनदोस्त झाली. याचं मोठं दुःख वीज केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांन इतकच तमाम परळीकरांनाही झाले आहे.


……………………………………………………………………………….

औष्णिक विज केंद्राची चिमणी (धुरांडी) नामशेष होण्याच्या तारखाचा क्रम.
◾12 सप्टेंबर 2022 रोजी 120 मीटर उंचीची चिमणी पाडण्यात आली.
◾ दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी 180 मीटर उंचीची चिमणी पाडण्यात आली .
◾संच क्रमांक ५ दि. 1 मार्च 2024 रोजी 210 मीटर उंचीची सर्वात उंच चिमनी पाडण्यात आली.
……………………………………………………………………………….
नवनवीन तंत्रज्ञान येत राहते , तसें जुन्या यंत्रासी,मशिनरी सोबत एक भावनिक बंध जुळलेला असतो. आज वीज केंद्राची सर्वात मोठी आणि परळी परिसरातून दिसणारी धुरांडी जमीनदोस्त झाली. यामुळे आम्हीही भावनाविवष होतो.

हे सगळं चालायचं, आपण नव्याचंही स्वागत करायला हवं. या जागेवर नवीन सोलर प्लांट होणार आहे.

डॉ. अनिल काठोये
मुख्य अभियंता परळी औष्णिक वीज केंद्र.