देशभरात बिबट्यांची संख्या सुमारे १३,८७४ झाली

🔸 जंगल /वन्य जीव संरक्षण /बिबट्या 🔸 गोवा राज्यातील बिबट्यांची संख्या नऊने घटली

नागपूर  : संपूर्ण देशात बिबट्यांच्या संख्येत वाढ होत असून वर्ष  २०१८ मध्ये देशभरात एकूण  १२,८५२ बिबट्यांची नोंद झाली होती. २०२२ मध्ये त्यात १,०२२ बिबट्यांची भर पडून हा आकडा १३,८७४ झाला.   संख्या गेल्या चार वर्षांत गोव्याच्या जंगलातील बिबट्यांची संख्या नऊने कमी झाली आहे. २०१८ मध्ये गोव्याच्या जंगलात ८६ बिबटे होते. २०२२ मध्ये ही संख्या ७७ इतकी झाली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नुकत्याच जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यात जंगलापेक्षा अधिक बिबटे मनुष्य वस्तीच्या नजीक आढळून आले आहेत.

२०१८ मध्ये संपूर्ण भारतात १२,८५२ बिबट्यांची नोंद झाली होती. २०२२ मध्ये त्यात १,०२२ बिबट्यांची भर पडून हा आकडा १३,८७४ इतका झाला आहे. गतवर्षी सर्वाधिक बिबट्यांची मध्यप्रदेशमध्ये (३,९०७) झाली. त्यानंतर या यादीत महाराष्ट्र (१,९८५), कर्नाटक (१,८७९), तामिळनाडू (१,०७०) या राज्यांचा क्रमांक लागतो. या चार राज्यांसह इतर काही राज्यांमध्ये २०१८ च्या तुलनेत २०२२ मध्ये बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली. गत चार वर्षांच्या काळात राज्यातील नेत्रावळी, म्हादई, मोले, बोंडला, खोतिगाव,  आदी ठिकाणच्या जंगलांत बिबट्यांचे अस्तित्व दिसून आले. गोव्याच्या जंगलामध्ये ७७ बिबटे असल्याचा अंदाज आहे, असे अहवालात म्हटले आहे.देशभरातील बिबट्यांचा अधिवास असलेल्या राज्यातील जंगल भागात आवश्यक अन्न उपलब्ध होत नसल्याने महाराष्ट्र, व  गोव्याच्या जंगलांतील बिबटे मानववस्तीत प्रवेश करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. जंगल लगतच्या महामार्ग , रस्ते यावरील भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली चिरडून काही बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील बिबटे मानववस्तीत घुसत असल्याने दोन्ही राज्यातील काही भागांमध्ये प्राणी आणि मानवातील संघर्ष वाढल्याचे चित्र दिसत आहे. यावर आवश्यक तो तोडगा कातन बिबट्यांचे संरक्षण करणे. वन खात्याने आवश्यक त्या भागांत बिबट्यांवर नजर ठेवणे गरजेचे आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.