भारतातील डिझायनिंग क्षेत्र हे जगातील विकसनशील देशांसाठी प्रेरणादायी

🔷 आर्ट /डिझाईन 

🔷  आर्ट डिझाइन अँड टेक्नॉलॉजीच्या संस्थापक डॉ. गीता नारायणन यांचे मत

पुणे- आज भारतातील डिझायनिंग क्षेत्र हे जगातील अनेक विकसनशील देशांसाठी प्रेरणादायी असून डिझाईन या क्षेत्रातील नवा आयाम आपण त्यांना दिला आहे. एनआयडी, एनआयएफटी आणि आयआयटी या संस्थांनी आज देशाला जगातील सर्वोत्तम डिझायनर दिले आहेत, डिझायनिंग हे केवळ औपचारिक शिक्षणाचे क्षेत्र नसून ती एक जीवनपद्धती आहे, असे मत बंगळूरू येथील सृष्टी स्कूल ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजीच्या संस्थापक संचालिका डॉ गीता नारायणन यांनी केले. असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया एडीआयच्या वतीने आयोजित १८ व्या पुणे डिझाईन फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी डॉ. नारायणन यांचा डिझाईन क्षेत्रातील योगदानासाठी यावर्षीच्या ऑनररी फेलो पुरस्काराने सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष ए बालासुब्रमण्यम आणि एडीआयच्या पुणे विभागाचे अध्यक्ष योगेश दांडेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात इसाबेला चॉव यांच्या \’हाँगकाँग – डिझाईन सेंटर – डिझाईन फॉर एशिया’ या – विषयावरील व्याख्यानाने झाली. इसाबेला यांनी या वेळी हाँगकाँग मधले डिझाईन कल्चर उलगडून दाखवले.

या वेळी डॉ. गीता नारायणन म्हणाल्या, मी स्वतः डिझाईन या विषयात औपचारिक शिक्षण घेतले नाही. मात्र कालांतराने मी या क्षेत्राच्या प्रेमात पडले. भारतातील अनेक डिझायनर्स कडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. आज भारतातील डिझायनिंग क्षेत्र हे जगातील अनेक विकसनशील देशांसाठी प्रेरणादायी असून डिझाईन या क्षेत्रातील नवा आयाम आपण त्यांना दिला आहे. एनआयडी, एनआयएफटी आणि आयआयटी या संस्थांनी आज देशाला जगातील सर्वोत्तम डिझायनर दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.