सोमय्या कला विद्या’ च्या वतीने कारागिरांच्या कलेला दाद; डिझाईन क्राफ्टद्वारे नवरसा सादर

🔷 कला कुसर/ हस्त कला /बांधणी /डिझाईन

मुंबई -कच्छ येथील कलाकारांनी साकारलेल्या अभिनव हस्तकला आरेखनांद्वारे भावनांना स्पर्श करून देण्याचा प्रयत्न. कला आणि शिक्षणाप्रती बांधिलकीकरिता प्रसिद्ध असलेली आघाडीची संस्था, सोमय्या कला विद्या दिनांक 1 मार्च ते 3 मार्च 2024 या कालावधीत द विंटेज गार्डन येथे ‘नवरसा’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले होते.  सोमय्या कला विद्येच्या आरेखन (डिझायनर) पदवीधर कारागिरांसाठी डिझाइन क्राफ्ट या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित, नवरसा हा सर्जनशीलता, हस्तकला आणि संस्कृतीचा अविस्मरणीय उत्सव ठरणार आहे. या उपक्रमाचा भर कारागीर डिझायनरना पाठिंबा देण्यासोबत त्यांच्या अपवादात्मक प्रतिभेचे प्रदर्शन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर असून, नवरसामध्ये 8 उल्लेखनीय कारागीर डिझायनर स्वत:च्या कलाकृती प्रदर्शित करतील. सोमय्या कला विद्येतून पदवी प्राप्त केलेले या कारागिरांनी आपल्या कलेवर प्रभुत्व मिळवले असून स्वत:च्या निर्मितीचे प्रदर्शन करण्यासाठी एकत्र येऊन उपस्थितांना भारताच्या कलात्मक वारशाच्या समृद्ध चित्रकलेची झलक दाखवली .
बांधनी, बडिंग टाय-डाय, सुफ भरतकाम, रबारी भरतकाम आणि विणकामासह इथे भेट देणारे नवरसा-9’च्या भावनिक संकल्पनेवर आधारित विविध प्रकारच्या वस्त्रविषयक कलाप्रकारांच्या अपेक्षा करू शकतात. इथे प्रत्येक कलात्मक भाग एक कथा सांगतो. कलाकृतीतून तिच्या निर्मात्याची अद्वितीय दृष्टी आणि कौशल्य प्रतिबिंब झळकेल. तुम्ही स्वत: अनुभवी कलाप्रेमी असाल किंवा नवनवीन शोध घेण्यासाठी उत्सुक असाल तर नवरसा प्रत्येकासाठी काहीतरी देण्याचे वचन देतो.
सोमय्या कला विद्या अलीकडील पदवीधरांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि कारागीर डिझाइनरच्या कामासाठी कौतुकास्पद बाजारपेठ तयार करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे आयोजन करते आहे.
डिझाईन क्राफ्ट’च्या डायरेक्टर अमरिता सोमय्या म्हणाल्या, “सोमय्या कला विद्या येथे आम्ही कारागिरांना पुन्हा डिझायनर होता यावे म्हणून लाभकारक जागा उपलब्ध करून देतो. त्यांना स्वत:ची खरी क्षमता समजावी आणि त्यांनी ती पुन्हा प्राप्त करावी हा उद्देश आहे. ते त्यांचे टार्गेट मार्केट निश्चित करतात, संकल्पना आणि आंतरराष्ट्रीय कल अंदाजांवर आधारित संग्रह तयार करतात आणि त्यांचा पारंपरिक पाया आणि मुळांचा विसर पडू न देता रचना आणि रंगांचा प्रयोग करतात. डिझाइन क्राफ्ट हे सोमय्या कला विद्या (एसकेव्ही)मधून पदवीधर झालेल्या कारागीर डिझायनरसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते, जो त्यांना अशा ग्राहकांपर्यंत थेट प्रवेश उपलब्ध करून देतो. याठिकाणी या कारागीर डिझायनरच्या कल्पकतेचे कौतुक होऊन त्यांचे महत्त्व अधोरेखित होण्यास मदत मिळेल. अशा प्रयत्नांमुळे, तरुण पिढी त्यांच्या पारंपरिक हस्तकलेकडे परतते असून आपल्या देशाच्या सांस्कृतिक अर्थव्यवस्थेत भर पडेल.”

नवरसा’च्या क्युरेटर आराधना नागपाल म्हणतात, “कारागीर ते कारागीर-डिझायनर होण्याच्या या परिवर्तनाचा आधार शिक्षण आहे. परंतु या कार्यक्रमाचा संपूर्ण दृष्टीकोन हा संवादात्मक सर्जनशील अनुभवांद्वारे मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा आहे. जे प्रेक्षकांना हस्त-निर्मितीत काय चालले आहे याबद्दल शिक्षित करते. शिवाय ही परंपरा आजही प्रासंगिक ठेवणाऱ्या कारागीर-डिझायनरला मान्यता देणे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित करते. नवरसा’मध्ये सर्व 8 कारागीर-डिझायनर्सची प्रात्यक्षिके आणि सादरीकरणे देखील असतील. ते त्यांच्या कलेबद्दल, नवरसातील त्यांच्या संग्रहाला कशामुळे प्रेरणा मिळाली आणि रचना साकारताना प्रक्रियेबद्दल बोलतील.”
प्रदर्शनापूर्वी दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी केवळ निमंत्रितांसाठी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पायल सिंघल, शिबानी अख्तर, रोशनी चोप्रा, मारिया गोरेट्टी, श्रुती सेठ, मिनी माथुर, श्रीला चॅटर्जी, अपर्णा बदलानी आणि नील भूपलम यासारखे विशेष अतिथी रॅम्पवर चालतील आणि सर्व 8 कारागीर-डिझायनर संग्रह प्रदर्शित केले गेले . दिनांक 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते .

मुंबई प्रतिनिधी : रमाकांत मुंडे