हिंगोली येथून शुक्रवारपासून जालना-मुंबई जनशताब्दी रेल्वे  

हिंगोलीकरांसाठी आनंदाची बातमी 

हिंगोली/ मराठवड्यातील प्रवाश्यांसाठी मुंबई कडे धावणाऱ्या जालना ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार करण्यात आला असून येत्या शुक्रवारपासून (दि.८) ही रेल्वे हिंगोली येथून पहाटे ५ वाजता निघून दुपारी २ वाजता मुंबईत पोहोचेल, अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.

खासदार पाटील यांनी सांगितले की, रेल्वे संघर्ष समितीसह विविध शिष्टमंडळांनी केंद्र शासनाकडे या बाबत सातत्याने पाठपुरावा केला.त्य मुळे येत्या  शुक्रवारपासून या रेल्वेला सुरुवात होणार आहे. हिंगोली स्थानकावरून शुक्रवारी पहाटे पाच वाजता ही रेल्वे  सुटणार आहे. वसमत, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरमार्गे दुपारी दोन वाजता मुंबईत येथे पोहोचणार आहे. या रेल्वेमुळे मराठवाड्यातील प्रवाशांची मुंबईला जाण्याची मोठी सोय झाली आहे.