🔷 नाना पाटेकरानी या वेळी सध्याच्या राजकीय घडामोडींवर नाराजी व्यक्त केली
नाशिक- शेती अर्थ प्रबोधिनी द्वारा आयोजित ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात नाना बोलत होते..शेतकऱ्याने आता मरु नये, जगावं जिद्दीने चांगले दिवस आणावे केवळ चांगले दिवस येतील याची वाट पाहू नये तर, त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील रहावे.सरकारकडे मागू नका, आता सरकार कोणते करायचे हे तुम्ही ठरवा, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर त्यांनी नाराजीही व्यक्त केली. शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. नाना पाटेकर यांच्या हस्ते शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून नाना पाटेकर यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा. पिकासाठी त्याचा एक रास्त भाव आहे तो देण्याच्या मागणीशिवाय आम्ही सरकारकडे दुसरे काही मागितलेले नाही. तसेच मला राजकारणात जाता येत नाही.. कारण जे पोटात आहे तेच माझ्या ओठावर येते. त्यामुळे राजकारणात गेलो तर दुसऱ्या दिवशी पक्षातून काढतील असा मिश्किल टोलाही नाना पाटेकरांनी लगावला.
राजकीय घडामोडींवर नाराजी व्यक्त करताना नाना पाटेकर म्हणाले, नेते अमर असल्यासारखे का वागतात? “महिनाभराने सर्व पक्ष संपलेले असतील. मग राजकारणात कशाला जायचे. कधी तरी आपण मारणार आहोत हे राजकीय नेत्यांना कधी कळणार आहे. मृत्यू अटळ आहे हे त्यांना माहित नाही का.अशी खंतही नाना पाटेकर यांनी बोलून दखवली. नटसम्राट मधील संवादाचा उल्लेख करत ते म्हणाले की, शेतकऱ्याने आता मरु नये, जगावं जिद्दीने चांगले दिवस आणावे केवळ चांगले दिवस येतील याची वाट पाहू नये तर, त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील रहावे.