तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा; कृषी मंत्री धनंजय मुंडे

🔷 कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया

मुंबई दि.6 : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस ,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

मंत्रालय मध्ये आज राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस ,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम आढावा व सन २०२४-२५ आराखड्यास मान्यता बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, वित्त विभागाचे सहसचिव डॉ माधव वीर, कृषी चे उपसचिव संतोष कराड, कृषी आयुक्त कार्यालयाचे संचालक दिलीप झेंडे यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुंडे म्हणाले एकात्मिक कापूस ,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रमात सोयाबीन यापीकाचा २६ जिल्ह्यांत समावेश आहे तर २१ जिल्ह्यात कापूस पीकांचा समावेश आहे.या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद वितरित करण्यात आली आहे त्यामुळे हा कार्यक्रम राबविण्यास गती द्यावी.या कार्यक्रमांसाठी आणखी निधीची गरज भासल्यास तो निधी ही उपलब्ध करून देण्यात येईल.

ही योजना समूह आधारित आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना केंद स्थानी ठेवून तयार करण्यात आलेली आहे.शेतकर्यानी नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापर वाढविण्यासाठी त्यांचा प्रचार व प्रसार करावा.तसेच सन २०२४-२५ च्या पिक प्रात्यक्षिकांच्या पॅकेज मध्ये सुद्धा
नॅनो युरिया व नॅनो डीएपी समावेश करण्यात येणार आहे.देशामध्ये नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरण्यात महाराष्ट्र राज्य एक नंबर बनण्यासाठी विभागाने मिशन मोडवर काम करावे असे निर्देश ही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.