
एआय तंत्रज्ञान /
केरळ/तिरुवनंतपुरम : देशात साक्षरतेत आघाडीवर असलेल्या केरळ राज्या मध्ये शिक्षण क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग केले जातात. नुकतीच विद्यार्थ्यांनसाठी तिरुवनंतपुरम येथील एका शाळेने चक्क एआय शिक्षिकेची निर्मिती केली आहे. ‘इरीस’ असे या देशातील पहिल्या एआय शिक्षिकेचे नाव आहे.
तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्यानव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तिरुवनंतपुरम येथील केटीसीटी
उच्च माध्यमिक शाळेने मेकर्सलॅब एज्युटेक कंपनीच्या सहकार्याने रोबोटिक्स व जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘इरीस’ची निर्मिती केली. ‘इरीस’ विध्यार्थ्याना तीन वेगवेगळ्या भाषेत शिकविते; तसेच त्यांच्या अनेक प्रश्नांचे उत्तर ही देते व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने संवादात्मक शिक्षणावर भर नवतंत्रज्ञान आणि एआयबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळू शकते

