श्री पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

बीड/सिरसाळा:. भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद नवी दिल्ली व अर्थशास्त्र विभाग श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा, व अतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने” भारतातील मानव विकास निर्देशांकाची सद्यस्थिती: विशेष संदर्भ मराठवाडा विभाग”या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक 13 मार्च 2024 बुधवार रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी 10.00 वा. प्रोफेसर डॉ. अनिलकुमार वावरे (अधिष्ठाता, मानवविद्याशाखा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा) यांच्या हस्ते होणार आहे
या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मा. श्री व्यंकटरावजी कदम साहेब असणार आहेत. या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सकाळी 11.00 वा. प्रमुख मार्गदर्शन प्रोफेसर डॉ. विनायक देशपांडे (कुलगुरू, जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती) यांचे सखोल मार्गदर्शन लाभणार आहे.
या सत्रासाठी सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबादचे उपप्राचार्य डॉ. एस. एल. मेढे यांची उपस्थिती असणार आहे.

दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी 2.30 वा. प्रोफेसर डॉ. बी. सुधाकर रेड्डी (अर्थशास्त्र विभाग, उस्मानीया विद्यापीठ तथा संचालक, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, दक्षिण प्रादेशिक केंद्र, हैद्राबाद) यांचे व्याख्यान होणार आहे या सत्राचे अध्यक्ष मुंबई येथील एस.एन.डी.टी. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. किशोर कदम हे राहणार आहेत. दुपारनंतरच्या ठीक 3.00 वा. संशोधन पेपर सादरीकरण सत्रात अर्थसंवाद जर्नल चे संपादक डॉ. राहुल म्होपरे (कोल्हापूर) व प्रोफेसर डॉ. दीपक भारती (अर्थशास्त्र विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई) यांच्या उपस्थिती मध्ये उपस्थित विविध प्राध्यापक, संशोधक यांच्यात विचार मंथन व चर्चा होणार आहे.त्याचबरोबर अहमदाबादचे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. जगतराव धनगर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

राष्ट्रीय चर्चासत्राच्या ठीक 4.30 वा. समारोप सत्र प्रसंगी रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री योगेशजी कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. तुकाराम मुंडे (आप्पास्वामी महाविद्यालय शेंदुर्जना आढाव, जिल्हा वाशिम) आणि अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. अर्थशास्त्र विभागाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी भारतातून व महाराष्ट्रातून अनेक प्राध्यापक, संशोधक, अर्थशास्त्र अभ्यासक, उपस्थित राहणार आहेत या राष्ट्रीय चर्चासत्रात “भारतातील मानव विकास निर्देशांकाची सद्यस्थिती: विशेष संदर्भ मराठवाडा विभाग ” या विषयाच्या अनुषंगाने प्रामुख्याने सर्वकष चर्चा व मंथन होणार आहे. म्हणून मराठवाड्यातील सामाजिक विज्ञान, अर्थशास्त्र, वाणिज्य शास्त्राचे अभ्यासक, प्राध्यापक, नियोजनकार, पत्रकार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व वैचारिक मंथनाचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. पाटील, संयोजक प्रा. डॉ. बालाजी आ. साबळे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) आणि डॉ. पी. बी. चिलपिंपरे यांनी केलेले आहे.