प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग  दर्शनास अलोट गर्दी

🔸 गुरुवारी एकादशीच्या  पर्वावर मोठी गर्दी, आज महाशिवरात्री, 🔸 शहर भाविक भक्तांच्या शिवनाम घोषाने दणाणले 
बीड /परळी-वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क – श्री वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्र महोत्सवाची मोठी जोरदार तयारी पूर्णत्वास गेली असून  देशभरातील  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र नगरीत महाशिवरात्री महोत्सव वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने  उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेजारील राज्यासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आदी राज्यातील लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
      महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शिवरात्री च्या दोन दिवस अगोदरच राज्य व परराज्यातुन भाविकांची मोठी गर्दी शहरात दिसून ये आहे. वैद्यनाथ मंदिराच्या पायर्‍यावर सुलभ दर्शन व्हावे या रांगेसाठी लोखंडी बॅरिकेट्स उभारण्याचे काम पुर्ण झाले असुन वाढत्या ऊनापासुन बचाव व्हावा म्हणुन भव्य मंडप टाकण्यात आला आहे. मंदिरात रंगरंगोटी करुन शिखरावर विद्युत रोषणाई  करण्यात आली आहे.
शुक्रवारी (ता.८) महाशिवरात्र असल्याने वैद्यनाथ मंदिरात लाखों भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणुन धर्मदर्शन मध्ये पुरुष व महिलांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या  आहेत. दरम्यान वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.  येथील महाशिवरात्री महोत्सव जवळपास तीन दिवसांचा असतो.
🔷 बंदोबस्त 🔸महाशिवरात्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात होणाऱ्या संभाव्य गर्दीचा प्रशासनाने अंदाज घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे मंदिरातील गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी 20 पोलीस अधिकारी,150 महिला व पुरुष कर्मचारी,100 होमगार्ड, 1 दंगल नियंत्रण पथक (25 कर्मचारी) डी बी पथक, शहर वाहतूक पथक, अग्निशमन दल असा एकूण सुमारे 300 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त यात्रेनिमित्त मंदिर आणि शहरात असणार आहे.
————————————————–
 
 
🔷 सुविधा 🔸मंदिर प्रशासनाच्या वतीने पश्चिम घाटावरील सर्व पायऱ्या वरती भाविक भक्तांचा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून मोठा मंडप ही घालण्यात आला आहे. महिला, पुरुष आणि पासधारक अशा वेगवेगळ्या रांगेची बैरिकेटिंग सज्ज झाली आहे . वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मुख्य शिखरावर आणि परिसरात मोठी विद्युत रोशनाई  करण्यात आली असून पिण्याची पाण्याची सोय, स्वच्छतागृहे आदींची सफाई आणि व्यवस्था करण्यात आली आहे.
………………………………………………….
🔷 सुरक्षा 🔸  राज्यासहित देशभरातून नागरिकांचा भाविक भक्तांचा ओढा प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने ही सुसज्ज अशी सुरक्षा यंत्रणा उभारलेली असून सुमारे 100 सीसीटीव्ही कॅमेरे मंदिर परिसरात तैनात केलेले आहेत त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे.
…………………………………………………
🔷 जिरेवाडीच्या प्रभु सोमेश्वराचा पालखी सोहळा🔸तालुक्यातील आणि शहरापासून जवळचं असलेल्या जिरेवाडी येथील जागृत देवस्थान श्री सोमेश्वर भगवंताचा पालखी सोहळा प्रभु वैद्यनाथ दर्शनासाठी  जिरेवाडी ते परळी असा दरवर्षीप्रमाणे महाशिवराञी  निमित्त निघणार आहे. श्री सोमेश्वर संस्थान व जिरेवाडी गावकरी मंडळींच्या  वतीने मागच्या अनेक वर्षांपासुनची परंपरा असलेल्या या सोमेश्वराचा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. जिरेवाडी येथुन सकाळी सात वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल टाळकरी मंडळी, लहान मुलामुलींचे टिपरी पथक, लेझीम पथक, बँन्ड बाजा पथक कलशधारी महिला असणारं आहेत.
……………………………………………………………..

🔷 यात्रा महोत्सवात प्रदर्शन आयोजनात प्रशासन  अनउत्साही 🔸
यावर्षी  नगर परिषदेवर  प्रशासक असल्याने लोकाभिमुख असे नियोजन दिसून येत नाही. मुखत्वे पुर्वी यात्रा महोत्सवात कृषी विभाग, पशु धन विभाग, फळफळावळ ची आणि इतर प्रदर्शन आयोजित केली जात होती ती या वेळेस तेवढा  उत्साह दिसून येत नाहीत.
—————————————————-

🔷 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर यात्रा 🔸
 बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या परळी शहरात दरवर्षी महाशिवरात्र महोत्सव निमित्त
 महाशिवरात्र यात्रा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाथ रस्त्यावरील मैदानावर भरत आहे.यासाठी आनंद नगरी होत असून  मैदानावर अनेक दुकाने, रहाट पाळणे, विविध मनोरंजनाचे प्रकार असणाऱ्या आनंद नगरीची उभारणी करण्यात येत आहे.