टिव्ही सिरीयल अभिनेत्री डॉली सोही यांचे निधन

🔷 दुःखद- गुरुवारीच डोली यांच्या बहिण अमनदीप यांचे कावीळ अजारामुळे निधन 

🔷 लोकप्रिय टिव्ही मालिका  🔸 कुसुम’🔸 ‘कुमकुम भाग्य’🔸 ‘भाभी’ 🔸’तुझ संग प्रीत लगाई सजना.

मुंबई : देशभरातील महिलांच्या लोकप्रिय टिव्ही मालिका कुमकुम, तुझ संग प्रीत लगाई यात अभिनय करणाऱ्या  महिला प्रेक्षकांत लोकप्रिय अभिनेत्री डॉली सोही (४८) यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. त्या कर्करोग ने त्रस्त होत्या.

डॉली या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने (सर्हायकल कॅन्सर) आजारी होत्या. केमोथेरेपी सुरू असताना अशक्तपणा जाणवल्याने त्यांना ‘झनक’ ही मालिका सोडावी लागली होती. डॉली यांच्या पश्चात मुलगी एमोलिया, भाऊ-बहीण, असा परिवार आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉली यांची थोरली बहीण अमनदीप यांचे कावीळमुळे गुरुवारी निधन झाले होते. दुसऱ्याच दिवशी डॉलीचेही निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २००० मध्ये प्रसारित झालेल्या ‘कलश’ या मालिकेद्वारे डॉली यांनी कारकीर्दीची सुरुवात केली होती. ‘हिटलर दीदी’, ‘देवों के देव महादेव’, ‘कलश’, ‘मेरी आशिकी तुम से ही’, ‘झांसी की रानी’ आदी हिंदी मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.