बंगळूर शहरात पाण्याची भीषण टंचाई

PC-The wire

🔷 पाण्याचे दुर्भिक्ष,जल संकट

🔷 पाण्याचा  अपव्यय केल्यास  ५ हजार रुपये दंड🔸 पिण्याचे पाणी दुरच सांडपाणी मिळणे दुर्लभ.

बंगळुरू (कर्नाटक) : शेजारील कर्नाटक राज्यात राजधानीच्या शहरात बंगळूर येथे पाण्याची मोठी भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शहरात प्रचंड  पाणी टंचाई आहे की आम्ही फ्लश देखील करू शकत नाही, असे बेंगळुरूचे नागरिक बोलत आहेत. पिण्याच्या पाण्याचा तीव्र टंचाईमुळे यापुढे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास ५ हजार रुपये दंड आकरण्याचा निर्णय घेण्यात आला.

महानगर प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासह सांडपाणी ही काटकसरीने वापरण्याचे आव्हान केले असून; नागरिकांनी वाहने धुण्यासाठी, बांधकामासाठी, मनोरंजनासाठी, सिनेमा हॉल आणि मॉल्समध्ये (पिण्याचे प्रयोजन वगळता) पिण्याच्या पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या आवाहनाचे उल्लंघन करणाऱ्यांवर रूपये ५,००० चा दंड आकारला जाईल आणि त्याची पुनरावृत्ती झाल्यास, प्रत्येक वेळी त्यांना ५०० चा अतिरिक्त दंड आकारला जाईल.