लिंगायत समाजाचा म्हणून मला राज्यसभेत संधी मिळाली …खा. डॉ अजित गोपछडे

🔷 खा. डॉ अजित गोपछडे यांचा सत्कार
बीड/परळी-वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क – मी लिंगायत समाजाचा म्हणून मला राज्यसभेत संधी मिळाली, परळी,आंबेजोगाई माझी कर्मभूमी असून संपूर्ण मराठवाड्यात विरशैव लिंगायत समाज जोडण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ अजित गोपछडे यांनी केले.
         येथील विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने नांदेड येथील डाँ अजित गोपछडे यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल येथील बेलवाडी येथे सत्कार समारंभ व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथे खासदार डॉ अजित गोपछडे बोलत होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा बसवेश्वर व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन खासदार डॉ अजित गोपछडे, विरशैव सभेचे जिल्हाधै दत्ताप्पा ईटके, मन्मथस्वामी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ आप्पा हालगे, गुरुवर्य पादेश्वर शिवाचार्य,डॉ चेतना अजित गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान डॉ अजित गोपछडे यांचा सपत्नीक  सत्कार विरशैव समाजाच्या वतीने दत्ताप्पा ईटके व सोमनाथ आप्पा हालगे यांच्या हस्ते शाल,पुष्पहार देवून करण्यात आला.यावेळी खासदार डॉ अजित गोपछडे यांच्या हस्ते विरशैव समाजातील पत्रकार प्रा प्रविण फुटके,डॉ.श्रीपाद बुरकुले, डॉ शशिकांत अंदुरे, शिवशंकर झाडे, गणपत हरंगुळे, श्रीमती गोदावरी चौधरी, रमाकांत गुजर,धनंजय स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना खासदार गोपछडे म्हणाले की, माझे व परळीचे जुने नातेसंबंध आहेत, गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून मी विद्यार्थीदशेत संघटनेत व नंतर राजकारणात प्रवेश केला.गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी मला संघर्ष   शिकवला. तसेच माझ्या खासदारकीच्या काळात मी मराठवाड्यात विरशैव समाजाचे संघटन करणार असून सर्व संघटनांनी मतभेद विसरून समाजासाठी एकत्र आले पाहिजे.
 तर यावेळी माजी नगराध्यक्ष सोमनाथ आप्पा हालगे यांनी खासदार गोपछडे यांच्या समोर समाजाच्या काही मागण्या मांडल्या. दत्ताप्पा ईटके यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी शिवाचार्य महाराज यांनी आपले विचार मांडले. यावेळी डॉ चेतना अजित गोपछडे, वैद्यनाथ बँकेचे संचालक महेश्वर निर्मळे, गुरुलिंग स्वामी संस्थांचे सचिव एडवोकेट गिरीश चौधरी, महाराष्ट्र सभेचे तालुका अध्यक्ष महादेव इटके, शहराध्यक्ष नितीन समशेटे, सुशील हरंगुळे,शाम  बुदरे, फुलारी सर, शिवकुमार केदारी, विकास हलगे , संजय स्वामी, चंद्रकांत उदगीरकर, शिवकुमार चौडे, दत्तात्रय गोपनपाळे, सोमनाथ गोपनपाळे, सर उमाकांत कोरे, संजय कोरे, प्रकाश खोत, वैजनाथ इटके अमोल बुरुकुल नितीन हलगे. बंडू चौडे नितीन तोडकरी, नरेश पिंपळे गणेश स्वामी संदीप चौडे महिला भजनी मंडळाचे अध्यक्ष श्रीमती आशाताई हरंगळे चेतना गौरशेटे सौ प्रसन्ना सांगकाये, मनीषा चौंडे, रमाताई आलदे, शिवकन्या ताई स्वामी श्रीमती प्रेमाला वेरूळे नंदी कोले ताई हुंडेकरी ताई बुदे ताई उज्वला काटकर उषा
हालगे कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विन मोगरकर यांनी तर आभार रमेश चौंडे.सुत्रसंचालन सचिन स्वामी यांनी केले. कार्यक्रमास महिला भजनी मंडळाच्या सदस्या, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.