खा. डाॅ. अजित गोपछडे यांनी घेतली पंकजाताई मुंडे, खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची भेट

🔷 यशःश्री निवासस्थानी येऊन मानले आभार; पंकजाताईंनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- दि १०
राज्यसभेवर नुकतेच निवडून गेलेले नवनिर्वाचित खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांची यशःश्री निवासस्थानी भेट घेतली.

राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर डाॅ. अजित गोपछडे आज पहिल्यांदाच शहरात आले होते, त्यांचेसमवेत त्यांच्या सुविद्य पत्नी चेतनाताई गोपछडे हया देखील होत्या. शहरात येताच सर्वात प्रथम त्यांनी यशःश्रीवर येऊन पंकजाताई व खा.प्रितमताई मुंडे यांची भेट घेतली व आभार मानले. यावेळी मुंडे परिवाराच्या वतीने गोपछडे पती-पत्नींचा पंकजाताईंनी सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.