◾गावभागात जागोजागी पालखीचे पूजन, स्वागत
बीड/परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क- बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभु वैद्यनाथाच्या महाशिवरात्र महोत्सवाची रविवार (दि.10) मार्च रोजी दिवशीय उसत्वाची सांगता पूर्वपार पारंपारिक पद्धतीने निघालेल्या पालखी सोहळ्याने झाली.
महाशिवरात्र निमित्त वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतिने दरवर्षी पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन असते. रविवार दि. 10 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता च्या सुमारास ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाचा पालखी सोहळा वैद्यनाथ मंदिरातुन निघाल्यानंतर देशमुखपार येथे गायिका पं. प्रज्ञा देशपांडे, पं. केतन अत्रे पुणे यांच्या भक्तीगित व अभंगवाणीचा कार्यक्रमस्थळी पहिला विसावा घेण्यासाठी पालखी काही वेळ थांबते.
पारंपरिक पद्धतीने आणि मार्गावरून ही पालखी गावभागात जाण्यासाठी देशमुखपार येथून अंबेवेस, गणेशपार, नांदुरवेस, गोपनपाळे गल्ली, येथे कलावंतांची हजेरी तर रात्री अंबेवेस येथे शोभेची दारु उडविण्यात आली. यानिमीत्त गणेशपार भागातील विठ्ठल मंदिर येथे उत्तमराव जोशी, कुमार जोशी, प्रकाश जोशी व जोशी परिवाराच्या वतिने पालखी मिरवणुकीत सहभागी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
जुन्या गाव भागात दारोदारी प्रभुवैद्यनाथाच्या पालखीचे ग्रामदैवताचे स्वागत करण्यासाठी महिला भाविकांनी भाविक भक्तांनी मोठा जल्लोष केला होता महिलांनी पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढत आपल्या ग्रामदैवताचे स्वागत केले. या पालखी सोहळ्यासोबत वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव बाबासाहेब देशमुख, राजेश देशमुख, पालखीचे भोई समाज मानकरी आदी असंख्य भाविक उपस्थित होते.
दरम्यान देशमुख पार येथे गायिका पं. प्रज्ञा देशपांडे, पंडित केतन अत्रे पुणे यांच्या भक्तीगित व अभंगवाणीचा कार्यक्रमाला ही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
