मकाऊ येथे विवेक ठोके यांचा गौरव volume exlence अवॉर्डने सन्मानित

🔸 छायाचित्रात श्री विवेक ठोके यांचा गौरव करताना व्यासपीठावरील मान्यवर .  

विक्री कौशल्य/व्यवसायातील मोठे यश

कोल्हापूर /एम एन सी न्यूज नेटवर्क.  :पुणे_बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर असलेल्या नागठाणे तालुका अतीत जिल्हा सातारा येथील मेसर्स विवेक ठोके आणि कंपनी या फर्मचे प्रोप्रायटर तसेच उच्चांकी वृक्षारोपण करण्यात कार्यरत असणारे  विवेक शैलजा महिपती ठोके यांचा काल  मकाऊ या देशामध्ये आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात गौरव करण्यात आला. दालमिया कंपनीचे सिमेंट ची सर्वाधिक विक्री केल्याबद्दल कंपनीने मकाऊ मध्ये हा भव्य गौरव समारंभाचा सोहळा आयोजित केला होता.

या सोहळ्यात विविध देशातील सिमेंट विक्री करणारे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय प्रमुख श्री सुनील अग्रवाल हे उपस्थित होते , महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यांमध्ये दालमिया कंपनीचे सिमेंटची उच्चांकी विक्रीकरून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात श्री विवेक ठोके यांनी उपस्थित राहून हा volume excellence पुरस्कार स्वीकारला . यापूर्वीही मे. विवेक ठोके आणि कंपनीला मागील दहा वर्षापासून सतत प्रतिवर्षी सिमेंट विक्री उच्चांकी केल्याबद्दल गौरविण्यात येत आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना गौरविण्यात आल्याने साळी समाजा मधील एका युवा बांधवांने ग्रामीण भागात राहून उद्योग व्यवसायात केलेली नेत्रदीपक प्रगती संपूर्ण समाजाला गौरवास्पद आहे.

या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून त्यांचा गौरव हा समाजातील युवा वर्गाने उद्योग व्यवसायात प्रेरणा दायी आहे . श्री विवेक ठोके हे कराड अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे संचालक श्री महिपती ठोके यांचे चिरंजीव आहेत तसेच जगतातील पहिला ऑनलाईन उद्योजक वधू वर मेळावा आयोजक आहेत. या ऑनलाईन वधू वर मेळाव्यात मुलांचे पेक्षा मुलींची नोंदणी अधिक प्रमाणात झाली होती.
दरम्यान श्री विवेक ठोके यांचा सिमेंट उद्योग व्यवसायात भरीव योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा झालेला गौरव देशभरातील बांधकाम क्षेत्रातील मान्यवराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वीकारून श्री.ठोके १२ मार्च रोजी त्यांच्या अतीत जिल्हा सातारा या मूळ गावी येणार आहेत.

_वृत्त संकलन , शब्दांकन
*श्री डी जी पागडे पत्रकार कोल्हापूर 9860101872