कर्तबगार महिला कर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंता काठोये यांच्या हस्ते सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम 

बीड /परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी औष्णिक विद्युत केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त दि ८ मार्च रोजी प्रशासकीय सभागृहात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मुख्य अभियंता अनिल कठोय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य अभियंता अमित बनकर, हिम्मतराव अवचार, प्रसन्नकुमार गरुड, कल्याणाधिकारी शरद राठोड यांची यावेळी उपस्थित होते.

मुख्य अभियंता अनिल काठोये म्हणाले कि घराची प्रगती महिलेच्या प्रगतीवर अवलंबून असते. एक महिला शिकली तर दोन कुटुंबाचा विकास होतो. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांमध्ये गंगा सातपुते, संध्या बावलगे, पूजा राठोड, सविता रोडे, पूजा सोमवंशी, मथुरा पिचारे, किशकिंदा गित्ते, उजम शहनाझ, इंदुमती मुंडे, आम्रपाली वाटोदे, आणि पूनम वानखेडे या कर्मचाऱयांना प्रशिस्तपत्र देऊन गन गौरव करण्यात आला.