बीड/एमएनसी न्यूज नेटवर्क –भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीड मधून पंकजा मुंडे, रावेर मधून रक्षा खडसे, नंदुरबार मधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत.
🔷 महाराष्ट्रातले भाजप उमेदवार
🔸 नंदुरबार- हीना गावित
🔸 धुळे- सुभाष भामरे
🔸 जळगाव- स्मिता वाघ
🔸 रावेर- रक्षा खडसे
🔸 अकोला- अनूप धोत्रे
🔸 वर्धा- रामदास तडस
🔸 नागपूर- नितीन गडकरी
🔸 चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
🔸 नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर
🔸 जालना- रावसाहेब दानवे
🔸 डिंडोरी- भारती पवार
🔸 भिवंडी- कपिल पाटील
🔸 मुंबई उत्तर- पियुष गोयल
🔸 मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
🔸 पुणे- मुरलीधर मोहोळ
🔸 अहमदनगर- सुजय विखे पाटील
🔸 बीड- पंकजा मुंडे
🔸 लातूर- सुधाकर श्रुंगारे
🔸 माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर
🔸 सांगली- संजयकाका पाटील