बीड/परळी वैजनाथ/एमएनसी न्यूज नेटवर्क- भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. पंकजाताईंना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी आज जाहीर झाली, यात बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजाताई मुंडे यांचे नाव येताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येवून पंकजाताई आगे बढो, खासदार डॉ.प्रितमताई आगे बढो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो..अशी जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक राजेश गिते, नितीन समशेट्टी, अश्विन मोगरकर, अनिष अग्रवाल, गोविंद मुंडे श्रीराम डापकर, विशाल मुंडे, रामकिसन गीते, किसन काठोळे, माऊली फड , विजयकुमार खोसे आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
••••