ममता बॅनर्जी गंभीर जखमी

🔸🔸🔸 घरात पाय घसरून पडल्या

कोलकाता : गुरुवारी पश्चिमबंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घरामध्ये पाय घसरून पडल्याने  यांच्या कपाळाला
गंभीर दुखापत झाली आहे. या दुर्घटनेत त्यांच्या कपाळाला फर्निचर  लागल्याने  जखम झाली असल्याचे तृणमूल काँग्रेस पक्षाने माहिती दिली आहे . त्यांना उपचारासाठी तातडीने कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ममता बॅनर्जी यांचा डोळे मिटलेला आणि जखमेतून रक्त ओघळताना दिसत असेलेला फोटो तृणमूल काँग्रेस पक्षाने गुरुवारी रात्री एक्स (x ) ध्यमावर सामायिक केल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली. या संदेशात आपल्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाली असून कृपया त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन करण्यात
त्रन आले आहे.