दोन कोटींची अवैध रेती जप्त

संग्रहित छायाचित्र

रेती चा काळा बाजार /अवैध उत्खनन 

🔸 23 जण अटकेत – 
🔸घर बांधणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर 

वर्धा/देवळी- घर बांधकामात सर्वाधिक महत्वाचा घटक असलेल्या वाळूची  राज्यभर बेकायदेशीर लूटमार चालू आहे. नुकतीच  देवळी तालुक्यातील पुलगाव जवळ असलेल्या सालफळ येथील रेती घाटावरून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेत – २ कोटी १५ लाख ९४ हजार ५०० – रुपयांचा ट्रकसह इतर वाहने जप्त – करण्यात आले आहे.

ही कारवाई पुलगाव पोलिसांनी बुधवारी केली. पुलगाव जवळील वर्धा नदीच्या पात्रातील सालफळ येथील रेती डेपोवर रात्री अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती प्राप्त होताच पोलिस आणि महसूल विभागाने कारवाई करत १० ट्रक, ४ चारचाकी वाहने, जेसीबी, अवैध रेतीसह २ कोटी १५ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत २३ जणांना ताब्यात घेतले.