४२ वे रणजी जेतेपद मुंबई

क्रिडा विश्व/ क्रिकेट
मुंबई : विदर्भाने केलेला जोरदार प्रतिकार सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी मोडून काढताना बलाढ्य मुंबईने विक्रमी ४२व्यांदा रणजी चषकावर आपले नाव कोरले. विजयासाठी ५३८ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाचा डाव गुरुवारी पहिल्या सत्रानंतर ३६८ धावांवर संपुष्टात आला.

कर्णधार अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांनी शतकी भागीदारी केल्यानंतर मुंबईने दुबेचा निर्णायक बळी मिळवला. मुशीर खान सामनावीर, तर तनुष कोटियन मालिकावीर ठरला.