शिवसेना (उबाठा) उपनेते संजय उर्फ बंडू जाधव यांनी घेतले ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचे दर्शन

बीड/परळी वैजनाथ/एमएनसी न्यूज नेटवर्क –उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार तथा शिवसेना उपनेते संजय उर्फ बंडू जाधव यांनी पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

देशातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे गुरुवारी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सपत्निक दर्शन घेतले व श्री प्रभू वैद्यनाथाची पूजा, आरती करून त्यांनी केली . वैद्यनाथ मंदिराचे पुरोहित राजाभाऊ दगडगुंडे, योगेश स्वामी यांनी अभिषेक पूजा केली. यावेळी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने खासदार संजय जाधव, सौ. क्रांती संजय जाधव यांचे मंदिर पुजाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्राध्यापक बाबासाहेब देशमुख, इंजिनीयर मुकुंद देशपांडे, शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश चौंडे, अतुल दुबे, संजय खाकरे,उपस्थित होते.