सत्ताधारी व्हा ! हा संदेश कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला दिला- नितीन ढाकणे

कांशीराम यांची  90 वी  जयंती साजरी 

बीड/परळी-वैजनाथ / एमएनसी न्यूज नेटवर्क- सत्ताधारी व्हा आणि आपले प्रश्न सोडवा हा मोलाचा संदेश बहुजन समाज पार्टीचे संस्थापक बहुजन नायक काशीराम यांनी बहुजन समाजाला दिला असे प्रतिपादन अतुल्य महाराष्ट्राचे संपादक नितीन ढाकणे यांनी केले. ते कांशीराम यांच्या 90 व्या जयंतीच्या निमित्ताने पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आज दिनांक 15 मार्च रोजी कांशीराम यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा संपादक नितीन ढाकणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे ज्येष्ठ नेते एडवोकेट डी.  एल. उजगरे होते . पुढे बोलताना नितीन ढाकणे म्हणाले की काशीराम यांनी पंधरा विरुद्ध पंचाऐशी हा सिद्धांत मांडला व बहुजन समाज सत्ताधारी होऊ शकतो हे दाखवून दिले. यावेळी बाबासाहेबांचे जाती व्यवस्थेचे निर्मूलन पुस्तक कांशीराम यांच्यासाठी मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले.यावेळी डी.एल. उजगरे बोलताना यांच्या विषयी अनेक आठवणींना उजाळा दिला
या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड ,प्रा .दशरथ रोडे ,दैनिक लोकमत समाचार चे अफसर सय्यद, बसपाचे नागसेन सोनवणे ,एडवोकेट बुद्धभूषण उजगरे, एस.के.गीते आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक फुले -आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे यांनी केले .तर आभार प्रदर्शन रानबा गायकवाड यांनी केले.