भ्रष्टरचार विरुद्ध कडक पावले
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्यास सर्व संस्था स्वतंत्र आहेत, आपल्या सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध ‘शून्य सहिष्णुता’ (झिरो टॉलरन्स) धोरण स्वीकारले असून, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
एका कार्यक्रमात मोदी यांनी सांगितले की, आपल्या सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत.
आम्ही शासनाचे नवे मॉडेल विकसित केले. प्रथम प्राधान्य देण्यात आलेल्या क्षेत्राकडे आम्ही विशेष लक्ष केंद्रित केले आहे.मागील दहा वर्षांत मोदी सरकार राजकीय पक्षांच्या विरोधात सीबीआय आणि ईडी यांसारख्या संस्थांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्याला उत्तर म्हणून मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. पुढे बोलताने ते म्हणाले विकसित भारत निर्माण करणे ही देशाची आता इच्छा आहे.
