भाई श्री फाउंडेशनचा दहावा सामूहिक विवाह सोहळा १० मे रोजी

सामाजिक -भाई श्री फाउंडेशनचा उपक्रम

छत्रपती संभाजीनगर: आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या समाज बांधवांना  सामूहिक विवाह दिलासा म्हणून भाई श्री फाउंडेशन तर्फे सोहळ्यात दि १० मे २०२४  रोजी सामूहिक दहाव्या विवाह सोहळ्याचे  आयोजन करण्यात आले आहे.  या सोहळ्यात आपल्या भागातील संत, प्रतिष्ठित नेते, व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाई श्री रमेशभाई पटेल यांनी दिली.

यावेळी ते पुढे म्हणाले, आजपर्यंत ६११ पेक्षा अधिक शेतकरी व गरीब बांधवांच्या पाल्यांचे सामूहिक विवाहाद्वारे कन्यादान केलेले आहे. यावर्षीही भाई श्री फाउंडेशन द्वारे आयोजित या भव्य सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गरजू व इच्छुक मुलांचे वय २१ वर्ष व  मुलीचे वय १८ वर्षे असलेल्यांना सहभागी होता येईल.
इच्छुक वर-वधू किंवा त्यांचे नातेवाईकांनी या सामूहिक विवाहासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत सामूहिक विवाह कार्यालय, भाईश्री चेंबर्स, वीर सावरकर चौक, जालना येथे नोंदणी करणे आवश्यक आहे. या सोहळ्यात वर- वधूस कपडे, संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात येतील. शेतकरी पालकांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांची नोंदणी करण्यात येईल. अशी माहिती पटेल यांनी दिली असून भाई श्री रमेशभाई, भावेश आर. पटेल, भाईश्री परिवारातील सदस्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.