🔸परिणाम निवडणूकीचा🔸
🔷 राज्यातील निवडणुकीमुळे सी. ए. परीक्षा लांबणीवर
🔷 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक १९ मार्चला जाहीर होणार
मुंबई– : सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएटच्या मे-जून महिन्यांत होणाऱ्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांकरिता सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने (आयसीएआय) जाहीर केले आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक १९ मार्चला जाहीर करण्यात येईल.
सीए इंटरमिजिएट गट १ ची परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी होणार होती. तर गट २ परीक्षा ९, ११ आणि १३ मे रोजी होणार होती. सी.ए. गट १ ची परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी, तर गट २ ची परीक्षा ८, १० आणि १२ मे रोजी होणार होती. सी.ए. फाउंडेशन कोर्सची परीक्षा २०, २२, २४, २६ जूनला होणार होती.