🔸 पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिरांत वस्त्रसंहिता; 🔸 भीमाशंकर मंदिरात आता तोकड्या कपड्यांत ‘नो एन्ट्री’
श्रीक्षेत्र भीमाशंकर/ पुणे : भीमाशंकर मंदिरात प्रवेश करताना आता तोकडे व अशोभनीय कपडे चालणार नाहीत. मंदिरात प्रवेशासाठी देवस्थानने वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त – मधुकरशास्त्री गवांदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र मंदिर महासंघाने ओझर का (ता. जुन्नर) येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिर संस्थांनी आपल्या मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू केला आहे. यामध्ये भीमाशंकर देवस्थानबरोबर कसबा गणपती आदी मंदिरांचा समावेश आहे.
देशातील अनेक मंदिरांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. देशभरातील सर्वच गुरुद्वारा मध्ये पुरुषांनी डोक्यावर रुमाल तर महिलानी डोक्यावर ओढणी,पदर घेणे आवश्यक आहे; तर दक्षिनेकडील राज्यात लुंगी गुंडाळून मंदिरात जावे लागते. महाराष्ट्रातील घृष्णेश्वर मंदिरात अंगावरचा शर्ट काढावा लागतो . या सर्वांचा प्रमुख उद्देश फक्त मंदिराचे पावित्र्य जपावे राखले जावे हाच आहे. त्यामुळे लोकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गवांदे यांनी केले आहे.