कोल्हापूरची सुप्रसिद्ध शिवभोले दाबेली आता कर्नाटकातील चिकोडीत मिळणार

(छायाचित्रात श्री सागर कांबळे व श्री धोंडीराम पागडे)

कोल्हापूर स्ट्रीट फूड /खाद्य परंपरा /शुद्ध तूपातील दाबेली

कोल्हापूर /एम एन सी न्यूज नेटवर्क -धोंडीरम पागडे –कोल्हापूर कुस्ती बरोबरच दर्दी खवयाचे शहर आहे. कढईत घोटलेले दूध असेल, कोल्हापुरी तांबडा -पांढरा रस्सा किंवा  झण झणीत कोल्हापुरी मिसळ. या सर्व पदार्थांनी राज्याच्या सीमा केव्हाच ओलांडल्या आहेत.  आता कोल्हापुरातील शुद्ध तुपातील सुप्रसिद्ध शिवभोले दाबेली आता  कर्नाटकातील चिकोडी येथे मिळणार आहे.

कोल्हापुरात सायबर चौकात एका तरुण बेरोजगार युवकाने दाबेली विक्रीचा व्यवसाय सुरू करून आज त्याला सात वर्षे झाली आहेत.  या सात वर्षात शिवभोले दाबेलीने आपल्या विनम्र आणि तत्पर सेवेसह  रुचकर चविमुळे शहरतील विविध भागात सात शाखा सुरू झालेले आहेत.  येत्या २० मार्च रोजी कर्नाटकातील चिकोडी या शहरात कोल्हापूरची सुप्रसिद्ध शिवभोले दाबेली विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे  शिव भोले दाबेलीचे प्रोप्रायटर युवा साळी समाज बांधव श्री सागर कांबळे यांनी दिली.

नुकतीच कोल्हापुरातील सायबर चौकात असलेल्या मुख्य शाखेला महाराष्ट्र न्यूज कनेक्ट चे जिल्हा प्रतिनिधि  श्री धोंडीराम पागडे यांनी भेट दिली. यावेळी सागर कांबळे म्हणाला आम्ही दाबेली बावीस प्रकारच्या वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये विक्री करतो, तसेच शुद्ध तुपातील दाबेली ची ही खास करून आमचे ग्राहकाकडून मागणी होते. सध्या कोल्हापूर शहरात शिव भोले दाबेलीच्या सात शाखा चालू आहेत.  २० मार्च रोजी चिकोडी कर्नाटक येथे शाखा चालू होत आहे.  तसेच पुढील एप्रिल महिन्यात पुणे येथेही शिवभोले दाबेलीची पहिली शाखा चालू करणार असून लवकरच पुणेकरांना ही शिवभोले दाबेली  मिळणार आहे .

दरम्यान महाराष्ट्रातील ज्या समाज बांधवांना या दाबेलीची फ्रॅंचायसी पाहिजे असेल त्यांनी श्री सागर कांबळे 9130965596
या नंबरवर संपर्क साधावा