अॅथलेटिक्स प्रशिक्षक भाऊ काणे यांचे निधन

क्रिडा विश्वात हळहळ 

नागपूर – क्रिडा विश्वात प्रशिक्षक म्हणून नागपूरचे प्रख्यात अॅथलेटिक्स प्रशिक्षक संजय ऊर्फ भाऊ काणे (७५) यांचे भाऊ या नावाने ते सर्वत्र सुपरिचित होते. रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रात्री निधन झाले. भाऊ काणे यांनी आपले संपूर्ण आयुष्य क्रीडाक्षेत्रासाठी वेचले. त्यांनी अॅथलेटिक्स प्रशिक्षणाला पूर्ण वेळ देता यावा म्हणून २००९ साली स्टेट बँकेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती.

भाऊ काणे यांनी आपल्या कारकीर्दीत नागपूरमधून ११ आंतरराष्ट्रीय अॅथलिट्स घडवले. भाऊ काणे यांच्या अॅथलेटिक्समधील कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांचा दादोजी कोंडदेव पुरस्काराने गौरव केला होता.