बनावट कॅन्सर औषध प्रकरणी ईडीचे १० ठिकाणी छापे,

धक्कादायक बनावट औषधी 

६५ लाख रुपये  रोकड जप्त

नवी दिल्ली-वृत्तसंस्था -कॅन्सर सारख्या जीव घाबरवणाऱ्य आजारा वर दिल्लीत मात्र कॅन्सरच्या बनावट औषधांचा पर्दाफाश झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यासह, ईडीने सोमवारी दिल्ली- एनसीआरमध्ये बनावट औषधे विकणाऱ्या टोळीच्या १० ठिकाणी छापे टाकले. या काळात ६५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही एक संघटित टोळी असून ती बनावट कॅन्सरच्या औषधांची निर्मिती करून विक्री करत असल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणात ईडीने या टोळीशी संबंधित काही आरोपी विफल जैन, सूरज शत, कोमल तिवारी,नीरज चौहान, अभिनय, परवेल मलिक आणि तुषार चौहान यांच्या ठिकाणांचा शोध घेण्यात आला.