सीए परीक्षांचे सुधारित वेळापत्रक

सीए परीक्षा 

मुंबई : निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सीए इंटरमिजिएट गट १चीं परीक्षा ३, ५ आणि ९ मे रोजी होणार आहे, तर गट २ ची परीक्षा ११, १५ आणि १७ मे रोजी होणार आहे.

सीए फायनल गट १ ची परीक्षा २, ४ आणि ८ मे रोजी होईल. गट २ ची परीक्षा १०, १४ आणि १६ मे रोजी होईल. इंटरनॅशनल टॅक्सेशनची परीक्षा १४ आणि १६ मे रोजी होईल.