लोको पायलट, को पायलट याच्यातील वाद अन् रेल्वे घसरली

अजमेर : रुळावरून गाडी घसरण्याच्या घटनेतील कारण समोर आले असून सोमवारी रेल्वे अपघाताचे कारण लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट या दोघातील वाद आहे स्थानक नजीक असताना गाडीचा वेग कमी असावा असं को पायलट सांगत होता मात्र पायलट नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं या दोघात वादावादी झाली आणि ते सिग्नल वर ब्रेक लावावयास विसरले असे समोर आले आहे. दोन्ही आरोपी चालकांनी ट्रेनच्या वेगावरून वाद झाल्याचे मान्य केले. वादात दोघेही सिग्नलवर ब्रेक लावायला विसरले, मात्र त्यानंतर अचानक ९० चा वेग असताना ब्रेक लावला. त्यामुळे रेल्वेचा काही भाग जवळून जाणाऱ्या मालगाडीला धडकला.

पायलट नानकराम यांनी ताशी ९० किमी वेग वाढवला. त्यावर असिस्टंट लोको पायलट सुलाल यांनी स्पीड ५० ठेवण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे दोघेही सिग्नल विसरले. नानकराम यांनी सांगितले की, सर्व सिग्नल मिळत होते. त्यामुळे मी वेग वाढवल्यावर सुलाल यांनी मला थांबविले. मालगाडी सिग्नलच्या पुढे जात होती. मी आपत्कालीन ब्रेक लावले. मात्र, धडकेने गाडी रुळावरून घसरली