आयकरातील  जाचक अटींमुळे यंत्रमाग उद्योग अडचणीत 

🔷 ४५ दिवसांच्या मुदतीत व्यवहार पूर्ण न केल्यास खरेदी किमतीवर ३० टक्के आयकर भरावा लागणार   🔷 आयकर कायद्यातील कलम ४३ इ यामध्ये केलेल्या बदलांमुळे यंत्रमाग व्यवसायिक सध्या हैराण 🔷 इचलकरंजी ,मालेगाव, भिवंडी, सोलापूर येथील  कापड कारखाने बंद होत असल्याने कामगार हवालदिल.

मुंबई- भिवंडी : देशात शेती क्षेत्रा नंतर सर्वाधिक मोठया प्रमाणात रोजगार देण्यात यंत्रमाग उद्योग व्यवसायात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी ही शहर यंत्रमाग उद्योगाची नगरी म्हणून ओळखले जातात. भिवंडी शहर परिसरात सुमारे दोन लाखाहून अधिक यंत्रमाग कारखाने आहेत. त्याच बरोबर कापडावर पूरक रंग प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग हा व्यवसाय सुध्दा मोठया प्रमाणात आहे. केंद्र सरकारने आयकर कायद्यातील कलम ४३ इ यामध्ये केलेल्या बदलांमुळे यंत्रमाग व्यवसायिक सध्या हैराण झाले असून व्यवसायात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आपले यंत्रमाग बंद ठेवले आहेत. तर काही उद्योग व्यवसायिकांनी गुजरात सुरत शहरात धाव घेऊन आपला व्यवसाय तिथे सुरू केले आहेत. त्यामुळे भिवंडीतील काही व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

यंत्रमाग कारखानदार व्यवसायिकांनी धागा (सुत) खरेदी केल्या पासून त्यापासून कपडा निर्मिती करून तो ४५ दिवसांमध्ये विक्री करून त्याचा व्यवहार पूर्ण केला पाहिजे अशी जाचक अट या नव्या आयकर विषयक कायद्यात नमूद आहे. त्याची अंमलबजावणी येत्या एक एप्रिल पासून होणार आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योग संघटना पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
व्यवसायीक हैराण झाले आहेत. या अटीमुळे यंत्रमाग व्यवसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे त्यांनी आपले
कारखाने बंद करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. धागा खरेदी नंतर वारपिंग अथवा सायझींग येथे धाग्याचे रोल अर्थात भीम बनविणे त्यानंतर यंत्रमाग कारखान्यात कपडा तयार होतो. त्यानंतर कच्चा कपडयावर डाईंगमध्ये रंग व इतर प्रक्रिया करून तो पक्का कपडा विक्री साठी तयार होतो. यामध्ये साधारण
८० ते ९० दिवसांचा कालावधी जात असून त्यानंतर विक्री केला जातो. यंत्रमाग व्यवसायात आर्थिक देवाणघेवाण व्यवहार हे मोठया प्रमाणावर उधार होत असतात. त्या मुळे केंद्र सरकार व राज्य शासनाने या उद्योगास संजीवनी देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत यंत्रमाग उद्योग चालक संघटना पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

🔸 त्यामुळे कपडा विक्री केल्यानंतर पैसे देण्याचा कालावधी सुध्दा मोठा असतो. ४५ दिवसांच्या मुदतीत व्यवहार पूर्ण न केल्यास धागा खरेदी करणाऱ्यास त्या खरेदी किमतीवर आयकर भरावा लागणार आहे. जो ३० टक्के असणार असल्याने छोटे यंत्रमाग कारखानदार भयभीत झाले असून त्यांनी धागा खरेदी बंद करून कपडा उत्पादन थांबवले आहे.
🔸 कारखाने  बंद होत असून कामगार वर्ग बेरोजगार होत आहे. भिवंडीला यंत्रमाग व्यवसायाला याचा फटका बसला असून हजारो कारखाने बंद झाले आहेत. काही यंत्रमाग व्यवसायिक हे करारनामा करून भाडेतत्त्वावर मजूरीने चालवत असल्याने छोटे यंत्रमाग कारखानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.