जिल्ह्यातील मराठा तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करणे थांबवा -मनोज जरांगे

इमानदारीत आणि प्रामाणिक निष्ठेत मोठी ताकत आहे.

पाटील यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

महासवांद बैठकीस दुपार पासूनच  मराठे सभास्थळी येण्यास सुरुवात.
सुमारें चार तास सकल मराठा समाज महिला, मुली, युवक जरांगे पाटलाच्या गरजवंत मराठ्यांचा लढा महा सवांद बैठकीस थांबून होते.

बीड/परळी-वैजनाथ – एम एन सी न्यूज नेटवर्क – मराठा समाज बांधवांवर दाखल करण्यात येत असलेले खोटे गुन्हे थांबवावेत अशी विनंती मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणि गृहमंत्र्यांना केली .नाहीतर मराठा समाजाची लाट तुमच्या अंगावर येईल असा गर्भित इशारा परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत जरांगे यांनी दिला. दरम्यान 24 मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे समाजाची अंतिम बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.

तमाम मराठ्यांना एकत्रित करण्याची किमया साधणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज परळीत महासंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ते परळी शहरात दाखल झाले होते. बैठकीचे सुरुवात करतानाच माझ्या लेकरांना, माझ्या समाजातील मुला -मुलींना न्यायमिळावा या साठीचा हा लढा आहे. तुम्ही एकजूट कायम ठेवा मा. न्यायालय आम्हाला न्याय देईल. मी समाजाला दैवत मानतो. मी काही कमावण्यासाठी इथे आलो नाही.समाजाने मला काही कमी पडू दिले नाही. पुढे बोलतांना जरांगे पाटील कोणाचं नाव न घेता गृहमंत्र्याच आणि त्याच ठरलं आहे की काय, बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या तरुणांवर विनाकारण गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. तुमच्याकडे पालकत्व आहे, त्या साठी आम्ही तुमच्या कडेच भांडू असं ते म्हणाले.

परळीतील ही महासंवाद बैठक नाही, ही विराट सभा आहे. या संवाद बैठकीने यापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या महा सवांद बैठकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

आपल्या समाजाप्रति आणि त्या अनुषंगाने अत्यावश्यक असणाऱ्या आरक्षणासंदर्भात भावना व्यक्त करत पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी समाजातील आरक्षणाबाबतच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श करत आरक्षणाचा लाभ आणि त्याबद्दल अनेक शंका कुशंकाना स्पर्श करत समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले. ते म्हणाले सरकारचं म्हणणे आहे 10 टक्के घ्या , हे टिकणार नाही तुमचं काय म्हणणे आहे तेव्हा उपस्थितातून घ्यायचे नाही असा सूर आला.नोकरीतील मराठा मुल मुली यांना आरक्षणाचा लाभ कसा होणार यावर ही ते बोलले. दरम्यानच्या काळातील सरकार बद्दल बोलताना ते म्हणाले त्यांनी डाव साधला आहे, तुम्ही एकजूट कायम ठेवा, त्यांना वाटलं आचार संहितेत काही करता येणार नाही पण आदर्श आचार संहिते नंतर गाठ आमच्याशी आहे. माझ्या समाजासाठी  मी मरण हातावर घेऊन फिरतो आहे, माझ्या साठी अनेक भयानक शढयंत्र रचले जात आहेत.

मराठा समाज एकवटत नाही.. एकदा एकवटला तर कुणाचं एकत नाही.
आपल्या बापजाध्यानी ह्यांचे पोम्प्लेट चीटकविले आहेत, आज ते आपल्या कडे बघत सुद्धा नाहीत. हे नेते आपल्या जीवावर दादागिरी करतात ते आपल्याला राबवितात, आता कोणाच्याही पुढं पुढं करणं थांबवा.असल्या नेत्या च्या पुढं – पुढं करू नका, आपल्या लेकरा बाळांना बघा, त्यांच्या कल्याणासाठी लक्ष द्या. आता समाज एकजूट झाला आहे, तो काहीही करावयास तयार आहे.

जो आपल्या साठी आपण त्याच्या साठी. या आजच्या महासंवाद बैठकीतून मी परळी शहरातून महाराष्ट्रतील सर्वांना तुम्ही १०० टक्के मतदान करण्याचं मी आव्हान करतो. निवडणूक आयोगाचे सुद्धा हेच म्हणण आहे.
आपल्याला कायद्याच्या चौकटी तून काम करायचं आहे. मराठा आरक्षणाच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याची जबादारी सरकारची आहे. आपण मागणी केलेल्या सगेसोयरे या शब्दरचने सहित आरक्षण आणि प्रमाणपत्र देण्यात येऊ शकतं. हिंदू कोडबिल मध्ये सगेसोयरे हे बसत. समाजाने अनेजणांना मोठं केलं आहे,ते ज्या समाजाने त्यांना मोठें केले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायला लागले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण मला भेटायला आले होते, त्यांनी अगोदरच मी समाजाचा म्हणून आलो आहे अस सांगितलं; त्यामुळे मी त्यांना जास्त बोललो नाही.

मी आजारपणाला भित न्हाई, माझी आई दोन तीन दिवसापासून आजारी पडली आहे, पण मला तिच्याकडे जाता आलं नाही. परळीतील माझे फोटो असलेल बॅनर काढले माझ्या फोटोच एव्हढ भिव आहे का? जाणून बुजून ते समाजाची नाराजी घेतं आहेत.

२४ तारखेस सगळेच अंतरवेली सराटीत मोठया संख्येने या मोठा निर्णय घेण्याची तयारी ठेवा. असं म्हणत दहा वाजण्याच्यापूर्वीच आदर्श आचारसंहितेचे पालन करत त्यांनी आपले बोलणं थांबवलं.