🔹भूकंपाचे केंद्र हिंगोलीत, ४.५ रिश्टर स्केलची नोंद,◽६:८ वाजेनंतर दुसरा हादरा ६:१९ वाजेदरम्यान बसला
हिंगोली – एम एन सी न्यूज नेटवर्क -मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही भागांना सकाळी ६ वाजून ८ मिनिट ते ६ वाजून २४ मिनिटाच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे.
तालुका प्रशासनाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे. भुकंपाचे दोन धक्के बसत आज सकाळी जमीन हादरली. गत तीन वर्षांत अनेक वेळा भूकंपाचे धक्के या भागात जाणवले आहेत. पण हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, वसमत, दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, नर्सी, कवठा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचे दोन हदरे लागोपाठ जाणवले.वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे,वापटी, परीसर भुकंपाचा केंद्र बिंदू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सहा वर्षांपासून धक्का…गत पाच ते सहा वर्षा पासुन भुकंपाचे धक्के बसत आहेत. २१ मार्च रोजी सकाळी ६.८ मि ला भुगर्भातुन जोराचा आवाज येत जमीन हादरली. आता पर्यंतचा हा सर्वात मोठा भुकंपाचा धक्का बसला आहे. हिंगोली जिल्ह्यासह नांदेड व परभणी या जिल्ह्यातील अनेक गावांना पण गुरुवार झालेल्या भुकंपाचे हादरे जाणवलहा दरे बसले त्यावेळी पक्षांनी किलबिलाट करणे सुरू केले. तर गोठ्यातील जनावरांनी हंबरडा फोडला. जमीन हादरताच नागरीक घराबाहेर पडणे सुरू केल.६:८ वाजेनंतर दुसरा हादरा ६:१९ वाजेदरम्यान बसला.