नर्गीस अंतुले  यांचे निधन

◾ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अ. र.  अंतुले यांच्या पत्नी

रायगड/ म्हसळा – एम एन सी न्यूज नेटवर्क – राज्याचे माजी मुख्यमंत्री  अ.र अंतुले यांच्या पत्नी नर्गिस (वय ८०) यांचे गुरुवारी मुंबई  येथे पहाटे ३ वा. सुमारास झाले. त्यांच्यावर  आंबेत येथील मूळगावी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात नीलम, मुबीना आणि शबनम या तीन मुली तसेच त्यांचे जावई मुश्ताक अंतुले असा  परिवार आहे. अतुले यांच्या राजकारणात पत्नी नर्गिस यांनी मोठी साथ दिली होती. खासदार सुनील तटकरे,  आ. रवी पाटील, काँग्रेसचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, नाझीम हसवारे आदी उपस्थित होते.