मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक

🔹ईडी ची कारवाई,
🔹दिल्लीत रात्री नऊच्या सुमारास घेतले ताब्यात

दिल्ली- आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्त वसुली संचालनालया (ईडी) कडून अटक करण्यात आली. आज शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केला जाणार आहे.

दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाकडून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या अन्य काही नेत्यांना यापूर्वीच अटक केलेली आहे. आत्तापर्यंत केजरीवाल  यांना चौकशीसाठी सुमारे ९  वेळा नोटीस दिली होती.  मात्र त्यांनी ईडीच्या नोटीस आणि अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटल्यानंतर सक्त वसुली संचालनालयाने त्यांना दहावी नोटीस बजावली आणि सर्च वॉरंट घेऊन त्यांचे निवासस्थान गाठले.  यावेळी ईडी च्या पथकात सुमारे 12 अधिकारी होते. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान केजरीवाल या प्रकरणात आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याची ही माहिती मिळते आहे. यापूर्वी मुख्यमंत्री पदावर असणारे झारखंड चे मुखयमंत्री हेमंत सोरेन यांच्यानंतर अटक होणारे दुसरे मुख्यमंत्री पदावर असणारे अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई झाली आहे.

…………….. .. ………………………….. …………………………………

🔹 मद्य घोटाळा
वर्ष 2021 मध्ये हे वादग्रस्त मद्य धोरण मंजूर केले गेले होते. दिल्ली सरकारने अन्य राज्यातील मद्य धोरणा पेक्षा वेगळे असणारे हे धोरण खाजगी कंपन्यांना मध्य विक्रीचा परवाना देण्याची तरतूद असणारे होते. मद्य दुकाने रात्री तीन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची या धोरणात तरतूद होती. मद्य परवानाधारकांना सवलती देण्यात आल्या होत्या खाजगी कंपन्यांना यामध्ये मोठे झुकते माप देण्यासाठीच हे धोरण बनवत आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या धोरणाची नंतर सीबीआय चौकशी सुद्धा झाली होती. भाजपा च्या आरोपानंतर दिल्ली सरकारने हे मद्य धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.