मार्च महिन्यातील सर्वाधिक मुंबईचा पारा ३९ अंश सेल्सिअस

मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद

मुंबई : या महिन्यातील गुरुवार २१ मार्च हा सर्वात उष्ण दिवस राहिला. सांताक्रुझ वेधशाळेत ३९ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. बुधवारीच वेधशाळेने ३७ अंशावर तापमान जाण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र प्रत्यक्षात तापमानात २ अंश सेल्सियसने वाढ झाली.

सांताक्रुझ वेधशाळेमध्ये गेल्या तीन दिवसात तापमान ३५ अंशापर्यंत नोंद झाली होती. गुरुवारपासून तापमानात वाढ झाली असून शुक्रवारी ३६ अंश सेल्सिअस, शनिवार ३५ अंश सेल्सियस आणि रविवारी ३६ अंश सेल्सियस तापमान राहणार असल्याचा अंदाज आहे. गुरूवारी नोंदवलेले ३९ अंश सेल्सियस तापमान मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान आहे.