◾बँक – वित्त संस्था आर्थिक वर्ष- वार्षिक हिशोब
नवी दिल्ली : या आर्थिक वर्षाचं शेवट अवघ्या आठवडाभरावर आला आहे.या महीन्यात ३१ मार्च रोजी रविवार येतं आहे, मात्र रविवार असला तरी बँका आणि आयकर विभागाची सर्व कार्यालये उघडी राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) व्यावसायिक बँकांसाठी यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे.
आयकर विभागानेही आपल्या सर्व कार्यालयां साठी नोटीस प्रसारित केली आहे. वित्त वर्ष २०२४ चे सर्व आर्थिक लेन – देण व्यवहार पूर्ण करण्यास सुविधा व्हावी, यासाठी रविवारीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.