जळगावात १० लाखांचे ड्रग्ज जप्त, काही दिवसपूर्वी भुसावळ मध्ये सुमारे ७३ लाख किमतीचे एमडी ड्रग जप्त
जळगाव- (वृत्तसंस्था)-राज्यात अविश्वासनिय असे मादक द्रव्याचे कोट्यावधी रुपये किमतीचे साठे आढळून येत आहेत. काही दिवसपूर्वी भुसावळात ७३ लाखांचे एमडी ड्रग जप्त करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच जळगाव शहरात दहा लाखांच्या एम.डी ड्रगसह दोघांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात संशयित आरोपी इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती (रा. शाहू नगर, पत्री मशिदीजवळ, जळगाव) हा रात्री १२.३० वाजता शाहू नगरातील पडक्या शाळेच्या आवारात एम.डी. ड्रग विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पथकाने सापळा रचला आणि इम्रानला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२२ ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. त्याचा साथीदार गोकुळ उर्फ रघू विश्वनाथ उमप (जळगाव) यालाही अटक केली आहे.