न्यायालय निरक्षण
सर्वोच्च न्यायालय; केंद्राची फेरआढाव्याची याचिका फेटाळली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आरोपीस अटक करण्यापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लेखी कारण द्यायला हवे, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळून लावली. आरोपीस अटक करून कोठडीत दाखल करण्याआधी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी अटकेबाबत लेखी कारण द्यायला हवे, जेणेकरून आरोपीस कायदेशीर मदत मिळू शकेल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयाने केंद्राची फेरविचार याचिका फेटाळून लावत उपरोक्त निर्णयाचा पुनरुच्चार केला. ‘ईडी’च्या नोटिसांना प्रतिसाद न देणे किंवा ‘ईडी’च्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे एकाद्यास अटक करता येऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.