अखेर मालदीव नरमला; जोडले हात

मुईज्जू यांनी भारतीय सैन्याच्या मालदीवमधील अस्तित्वाला हरकत घेतली होती. 

मालदीव: चीनचे वरद हस्त आपल्या पाठीशी आहे अस समजत चीनच्या दबावाखाली त्याचा मानसिक दास बनलेले आणि सातत्याने भारताविरुद्ध वक्तव्ये करणारे मालदीव राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू अखेर नरमले आहेत.भारताचे जवळपास ३५ अब्ज रुपये मालदीववर थकीत आहेत. ते चुकते करण्यासाठी भारताने मालदीवला अल्टिमेटम दिला होता.

त्यामुळे या अल्टिमेटम नंतर मुहम्मद मुईज्जू हादरलेच आणि भारत हा आमचा निकटवर्तीय सहकारी आहे. भारताकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत, अशी उपरती त्यांना झाली. भारताने आम्हाला मुदत द्यावी, अशी विनवणीही त्यांनी केली आहे.