राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत चि.सूर्या सचिन सौंदळे यास सूवर्णपदक तर कु.सानवी सौंदळे सह सब ज्युनिअर संघास सुवर्णपदक प्राप्त

जिल्ह्याचा अभिमान-

जम्मू-कश्मीर येथील राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टीक स्पर्धा मौलाना आझाद(एम ए) स्टेडीअम जम्मू-कश्मीर येथे दि.22 ते 24 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आल्या. 

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क  पंचम ज्योतीर्लिंग वैद्यनाथाच्या परळी नगरीतील सुपुत्र चि.सूर्या सचिन सौंदळे याने जम्मू-कश्मीर येथील राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत नॅशनल डेव्हलपमेंट (9ते11वर्षे) वैयक्तिक गटातून सुवर्णपदक व त्याशिवाय मिश्र तिहिरी चे रौप्य पदक पटकावले तर त्याचीच ज्येष्ठ भगिणी कु.सानवी सौंदळे हीने सब ज्युनिअर गटात यश मिळवत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. चि.सूर्या व कु.सानवी सख्खे भाऊ-बहीण यांच्या दैदीप्यमान यशामुळे आपल्या परळी शहराचेच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा,मराठवाडा प्रदेश व महाराष्ट्र राज्याचे नांव उज्जवल केले आहे.
सूर्या-सानवी परळी-वैजनाथ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा समुपदेशक जी.एस.सौंदळे (गुरूजी) यांची नातू-नात असून,राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांचे पुतणे आहेत.
राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टीक स्पर्धा मौलाना आझाद(एम ए) स्टेडीअम जम्मू-कश्मीर येथे दि.22 ते 24 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या.

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून तसेच छत्रपती संभाजी नगरच्या खेळाडूंसह देशातील विविध राज्यातून एरोबिक जिम्नॅस्टिक खेळाडूंची निवड करण्यात आली होती. सदरील स्पर्धेत राष्ट्रीय डेव्हलपमेंट गटातून चि.सूर्या सौंदळे याने व्यक्तिक गटातून सुवर्णपदक प्राप्त केले तर ट्रिओ गटातून रौप्य पदक पटकावले तसेच कु.सानवी सौंदळे हीने ईतर खेळाडूंसह सब ज्युनि्अर गटातील जम्मू-कश्मीर येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
भारत देशाच्या विविध राज्यातील खेळाडूंसह महाराष्ट्राचा संघ नॅशनल डेव्हलपमेंट ग्रुप, सब ज्युनिअर,ज्युनिअर,
सिनीअर,अशा चार वयोगटात पुरूष एकेरी,महिला एकेरी,मिश्र दुहेरी,तिहेरी समुह व एरो डान्स या सादरीकरण प्रकारात खेळाडू सहभागी झाले होते.

जम्मू-कश्मीर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक स्पर्धेतून मे महीण्यात होणा-या सुझुकी वर्लडकप,जपान व एरोबिक जिम्नॅस्टीक्स एशियन चॅम्पिअनशिप,व्हितनाम या दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे.
महाराष्ट्राच्या संघासाठी अध्यक्ष संजय शेटे राज्य संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी,तांत्रिक समिती सदस्य मकरंद जोशी,प्रशिक्षक व पंच विवेक देशपांडे,अमेय जोशी,डॉ.निलेश जोशी,ईशा महाजन,दिपाली बजाज,हर्षल मोगरे,ऋग्वेद जोशी,हर्षद कुलकर्णी,संघ व्यवस्थापक राहुल पहुरकर व साक्षी लड्डा सह ईतर प्रशिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन खेळाडूंना मिळाले.
सूर्या-सानवी बंधू-भगिणीसह महाराष्ट्रातील खेळाडूंनी जिम्नॅस्टिक सारख्या खेळात मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन तसेच आंतर राष्ट्रीय स्पर्धेच्या यशासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.